इस्लाम धर्म मानवतेचा संदेश देतो.. जेष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे (औंधरोड बोपोडी )... "ईद मिलन कार्यक्रम " रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट )या पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आला या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे  रिपाई (सचिन खरात गट )या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सचिनभाऊ खरात, मार्गदर्शक  जेष्ठ विचारवंत मा. डॉ.कुमार सप्तर्षी साहेब, "चल हल्ला बोल "चित्रपटचे दिग्दर्शक मा. महेश बनसोडे, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या महिला प्रदेशाध्यक्षा गौसिया खान हे मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम रिपाई (सचिन खरात गट )पक्षाचे मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य मा. फिरोज मुल्ला (सर )यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. मान्यवरांचा सत्कार स्वागताध्यक्षा सौं शकीलाताई मुल्ला यांनी केला या कार्यक्रमाचे आयोजन संदीपभाऊ शेंडगे यांनी केले 

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले इस्लाम धर्म मानवतेचा संदेश देतो ते जेंव्हा ऐक मेकांना "अस सलाम वॉलेकूम वालेकुम अस सलाम म्हणतात त्याचा अर्थ  किती सुंदर आहे म्हणजे तुम्ही सुखरूप सलामत राहा इस्लाम धर्मामध्ये गुलाम मुक्त शिकवण आहे ते फक्त आल्हाचे गुलाम आहेत बाकी कोणाचे नाही म्हणून ते फक्त आल्हा समोर झुकतात त्याला नमन करतात या कार्यक्रमात सर्व जातीच्या लोकांना बोलवले जात आहे म्हणून मी येथे आलो पण एकाच जातीच्या लोकांच्या कार्यक्रमात मला जायच नाही कारण त्या जातीचं संघटन तयार होत आणि त्याचा ऐक बदमाश नेता तयार होतो हे देशाचा हिताने फार धोदायक बाब आहे आपण दुसऱ्या जातीच्या लोकांचा विचार केला पाहिजे आणि सार्वजनिक जीवनात दुसऱ्या जातीचा द्वेष करून कस राहू शकतो पण हिंदू बनायचं असलं तर देवाची पूजा करून तो हिंदू होत नाही तर मुस्लिमांना शिव्या दिल्या  द्वेष केला की तो कट्टर हिंदू असी आताची परिस्थिती झाली आहे हामुळे भारत देशाचे फार मोठे नुकसान होणार आहे आपण जाती घट्ट करण्यापेक्षा भारतीय आहोत अस बोललं पाहिजे अशा अनेक महत्वाच्या विषयावर राष्ट्रीय एकातमतेवर त्यांनी आपल मनोगत व्यक्त करत सर्व भारतीयांना ईदच्या शुभेच्छा दिल्य

यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे ट्रस्टचे अध्यक्ष तुषार मोहिते,स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष जीवन घोंघडे,रिपाई (सचिन खरात गट )पक्षाचे प्रदेश सचिव व पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय चोपडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व पुणे शहर अध्यक्ष राजाभाऊ कांबळे, पुणे शहर उपाध्यक्ष अशोक पवार,पुणे शहर युवक उपाध्यक्ष अक्षय कटके, कोल्हापूर कामगार आघाडी शहर अध्यक्ष तानाजी शिंदे, उपाध्यक्ष दिलीप कुदळे, सेक्रेटरी दिनकर थोरात,जनहित जागृती मंचाचे अध्यक्ष विजय जगताप,युसूफभाई सय्यद, आरिफभाई शेख, अस्लमभाई वाटरे, राजेश रेड्डी,शहीदभाई मुजावर, साजिदभाई सय्यद, आलिभाई सय्यद, मुक्तारभाई माणियार, अल्ताफभाई शेख,प्रवीण चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते  युसूफभाई सय्यद, आरिफभाई शेख, अस्लमभाई वाटरे, राजेश रेड्डी,शहीदभाई मुजावर, साजिदभाई सय्यद, आलिभाई सय्यद, मुक्तारभाई माणियार, अल्ताफभाई शेख,प्रवीण चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post