तांत्रिक विश्लेषणच्या सहायाने कुशल कामगिरी करत चोरट्यांना केले अटक संपुर्ण माल हस्तगत.
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
देहुरोड दि. : - देहुगांव तळवडे येथे अज्ञात चोरट्यांनी लाखोंचा माल लंपास केल्या प्रकरणी देहूरोड पोलीसांनी तांत्रिक विश्लेषणच्या सहायाने दोन जणांना अटक केले आहे .
याबाबत माहिती अशी कि दिनांक ०७/०४/२०२५ रोजी ५:३० ते दिनांक ०८/०४/२०२५ सकाळी ०९:०० च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शिवनेरी इंजिनिअर कंपनी तळवडे, देहुगाव या कंपनीचा मागील बाजूकडील पत्रा उचकटून चोरट्यांनी कंपनी मधील ५,२०,००० रुपये किमतीचे तांब्याचे शीट चोरून नेल्या बाबत मयूर रंगनाथ साळुंखे राहणार यमुनानगर निगडी पुणे यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली होती याबाबत देहूरोड पोलीसांनी गुन्हा रजिस्टर नंबर १०४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५(२), ३३१(३), ३३१(४) प्रमाणे दिनांक ०९/०४/२०२५ रोजी देहूरोड पोलीसांनी गुन्हा नोंदविला होता.
गुन्ह्याच्या तपासा दरम्यान घटनास्थळ वरील पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता आरोपींनी चोरी करताना चारचाकी वाहन वापरल्याचे दिसून आले. परंतु चारचाकी वाहनास पुढे व पाठीमागे नंबर प्लेट नसल्याने तपासास पुढील दिशा मिळत नव्हती. म्हणून घटनास्थळावरील डमडाटा काढण्यात आला. त्याचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर त्यामध्ये दोन संशयित व्यक्तींचे भ्रमणध्वनी क्रमांक प्राप्त झाले. संशयितांची दोन भ्रमणध्वनी क्रमांकाचे सी डी आर काढून लोकेशन चेक केले असता ते अंधेरी मुंबई येथील दिसून आले. त्याप्रमाणे तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलिस अंमलदार यांच्या मदतीने गुन्ह्यातील घटनास्थळ तळवडे ते अंधेरी मुंबई येथील सुमारे शंभर ते दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्यात आले. त्यानंतर संशयित दोन मोबाईल नंबर चे सी.डी.आर. चे तांत्रिक विश्लेषण करून, आरोपीं निष्पन्न करून स्थानिक पोलीसांच्या मदतीने इसम नामे १) सईदुल हसन नुरूल हसन उर्फ बाघेभाई, राहणार-भंगारवाडी अंधेरी पूर्व मुंबई, २) अब्दुल रहीम अब्दुल वाहिद खान उर्फ दादू राहणार सुभाष नगर अंधेरी पूर्व मुंबई येथुन ताब्यात घेऊन, त्यांना अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडे अधिक खोलवर तपास करून, वरील नमूद आरोपींकडून चोरीस गेलेला माल पुर्णपणे हस्तगत करण्यात आले आहे तसेच चोरट्यांनी गुन्हयामध्ये वापरलेली महिंद्रा एक्स.यु.व्ही. ५०० चारचाकी वाहन क्रमांक एम एच ०२ डी झेड २१५७ गाडी पोलीसांनी जप्त केली आहे. याबाबत अधिक सखोल चौकशी देहूरोड पोलीस करीत आहे अशी माहिती देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी प्रसिध्दी माध्यमांच्या द्वारे दिली आहे.