सण उत्सव वर्गणीच्या नावाखाली खंडणी मागून पैसे उकळणार आरोपीस देहुरोड पोलिसांनी केले एका तासात अटक.

            वीस ते पंचवीस व्यवसायकांना धमकी देत केले खंडणी वसूल विविध कलमा खाली राजा पिल्ले वर गुन्हा दाखल .         







प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे ,:

  देहूरोड दि. :-  वर्गणीच्या नावा खाली खंडणी वसूल करणाऱ्या इसमास देहुरोड पोलीसांनी अटक केले आहे दिनांक ११ रोजी खंडणी मागीतल्या प्रकरणी बाचाबाची झाल्याने अरविंद कटारिया यांना तीव्र ह्दय विकाराचा झटका आल्याने त्यांना आधार रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले नंतर शोकाकुल वातावरणात अंत्य संस्कार करण्यात आले या बाबत देहूरोड पोलीसांनी माहिती देताना दिली कि व्यावसायिक प्रशांत अमृतलाल कटारिया राहणार मेन बाजार देहूरोड पुणे यांचे वडील अमृत लाल कटारिया व चुलते अरविंद कुंदनमलजी कटारिया या दोन भावांची देहूरोड मेन बाजारपेठत कुंदन ड्रेसेस कुंदन साडी सेंटर अशी दोन कपड्यांचे दुकाने आहेत दिनांक 11/ 4/ 2025 रोजी इसम राजू मासलामणी पिल्ले उर्फ राजा पिल्ले राहणार मरी माता मंदिर शेजारी गांधीनगर झोपडपट्टी देहूरोड पुणे असे असून राजा पिल्ले कुंदन ड्रेसेस कुंदन साडी सेंटर या कपड्याच्या दुकानात गेला व त्याने आंबेडकर मित्र मंडळ मेन बाजार देहूरोड पुणे या नावाखाली प्रत्येकी 501  रुपयाचे दोन पावती दिल्या त्याप्रमाणे पैसे गोळा करण्याकरिता दिनांक 12/4/2025 रोजी दुपारी तीन वाजता च्या सुमारास कुंदन साडी सेंटर जैन मंदिर शेजारी देहूरोड मेन बाजार देहूरोड या दुकानदारा कडे येऊन दोन पावत्या प्रमाणे 1000 रुपयाची मागणी केली त्यास व्यावसायिक प्रशांत कटारिया यांचे चुलते अरविंद कटारिया यांनी रोख पाचशे रुपये देऊन निघून जाण्यास सांगितले असता, इसम नामे राजा पिल्ला याने व्यावसायिक अरविंद कटारिया यांना तुम्हाला येथे धंदा करणे मुश्किल करून टाकीन, तसेच तुम्हाला कायमचे संपवून टाकीन अशी जीवे मारण्याची धमकी देऊन पाचशे रुपये रोख घेऊन आणखी पाचशे रुपये घेण्याकरिता धमकी देऊन निघून गेला, सदर घटनेबाबत व्यावसायिक प्रशांत कटारिया यांनी देहूरोड बाजारातील इतर व्यवसायिक दुकानदार यांना राजे पिल्ले यांच्या बाबत विचारणी केली असता राजा पिल्ले यांनी कोणते ही मंडल नोंदीत (रजिस्टर) नसताना अथवा कोणते ही अधिकार पत्र नसताना देहूरोड बाजारातील सुमारे वीस ते पंचवीस व्यवसायकांना अशाच प्रकार पावत्या देऊन त्यांना धमकी देऊन खंडणी स्वरूपात पैसे गोळा केल्याचे दिसून आले, सदरचे घटनेवर व्यावसायिक प्रसाद अमृतलाल कटारिया यांनी देहुरोड बाजारपेठ व्यापारी संघटनेतील पदाधिकारी व व्यावसायिक यांच्याशी विचार विनिमय करून त्यांनी देहूरोड पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 13/ 4/ 2025 रोजी कायदेशीर तक्रार दिल्यावरून देहूरोड पोलीस ठाणे मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 109 /2025 भारतीय न्याय संहिता कलम 308 (2) 308 (3) 308 (4) 308 (5) याप्रमाणे राजा मासलमणी पिल्ले उर्फ राजा पिल्ले यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, गुन्हा नोंद होताच एका तासाच्या आत आरोपी राजू मासलमणी पिल्ले उर्फ राजा पिल्ले यास देहुरोड पोलिसांनी अटक केली आहे, सदरची उल्लेखनीय कामगिरी विशाल गायकवाड सहा. पोलीस आयुक्त परिमंडळ 2, पिंपरी चिंचवड बाळासाहेब कोपनर सहायक पोलीस आयुक्त, देहूरोड विभाग यांचे अधिपत्याखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, देहुरोड यांचे सूचनानुसार देहूरोड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सावंत कुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक लखन कुमार वावळे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार प्रवीण माने पोलीस हवालदार बाळासाहेब विधाते ,पोलीस शिपाई अमोल माने, पोलीस शिपाई युवराज माने, पोलीस शिपाई संतोष महाडिक यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post