प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - जोतिबा डोंगर येथे ज्योतिर्लिंग यात्रे निमित्त सेक्टर नं.-3 या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या महिला होमगार्ड आशाराणी मारुती पाटील (वय 45.रा.शाहुवाडी ,जि.कोल्हापूर) यांच्या डोक्यात सासनकाठी पडून जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी जोतिबा डोंगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.त्यांच्या डोक्यास मार लागल्याने तेथे उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेतुन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.हा प्रकार शुक्रवार (दि.11 मार्च) रोजी दुपारी एकच्या सुमारास घडला.त्यांना घटना स्थळी उपचारासाठी हातकंणगले येथील 1403 जीवन बाणेकर यांच्या पथकासह इंचलकरंजी येथील अनिता जाधव यांच्या पथकाने मदत केली.
या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.