'पेट से बडा खेत न देना 'अशी प्रार्थना करणारे ज्ञानपीठ विजेते कवी विनोद कुमार शुक्ल

प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.co

" एक माणूस हताशपणे बसला होता,मी त्याला ओळखत नव्हतो, पण त्याची निराशा ओळखून होतो ,म्हणून मी त्याच्या जवळ गेलो, माझा हात पुढं केला , तो माझा हात धरून उभा राहिला, तोही मला ओळखत नव्हता पण,माझं हात पुढं करणं त्यानं ओळखलं,आम्ही दोघं सोबत चालायला लागलो ,दोघं एकमेकांना ओळखत नव्हतो पण

सोबत चालणं ओळखून होतो " किंवा " जे माझ्या घरी मला भेटण्यासाठी कधीही आले नाहीत, त्यांना भेटण्यासाठी त्यांच्याजवळ मी जाईन , एक वाहणारी नदी कधीही माझ्या घरी येणार नाही.पण त्या नदीसारख्या लोकांना भेटायला मी नदीच्या किनारी जाईन ,पाण्यात पोहेन किंवा बुडूनही जाईन, जे सतत कामात व्यस्त आहेत त्यांना वेळ काढून एका अती महत्त्वाच्या कामाप्रमाणे मी भेटेन. या माझ्या एकमेव शेवटच्या इच्छेला खरेतर मी माझी पहिली इच्छा मानेतो.'

"अर्थात जे उत्तम त्याला भेटण्यासाठी मी स्वतः जाईन . मी

मानवतावादाशी जोडला गेलेला लेखक माणूस आहे.असं  माणसाच्या सोबतीचे महत्त्व आपल्या कवितेतून सांगणाऱ्या थोर साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांना २२ मार्च २०२५ रोजी भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असलेला ५९ वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. ज्ञानपीठ मिळवणारे ते छत्तीसगडचे पहिलेच लेखक. 


विनोद कुमार शुल्क हे हिंदी भाषेतील फार मोठे साहित्यिक आहेत. प्रतिभा रे यांच्या अध्यक्षतेखालील माधव कौशिक, दामोदर मौजो,प्रभा वर्मा, अनामिका, ए.कृष्णाराव, प्रफुल्ल शिलेदार ,जानकी प्रसाद शर्मा आणि ज्ञानपीठचे संचालक मधुसूदन आनंद यांच्या समितीने हा पुरस्कार जाहीर केला. हिंदी साहित्य, सर्जनशीलता आणि अद्वितीय लेखन शैलीतील उत्कृष्ट योगदानासाठी विनोद कुमार शुक्ल यांना हा सन्मान देण्यात येत आहे असे समितीने स्पष्ट केले आहे. शुक्ल यांचे साहित्य मराठी मध्ये निशिकांत ठकार, प्रफुल्ल शिलेदार आदींनी अनुवादित केले आहे. मराठीमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार वि.स. खांडेकर (१९७४)वि.वा. शिरवाडकर (१९८४) विंदा करंदीकर (२००३)आणि भालचंद्र नेमाडे(२०१४ ) मिळालेला आहे.


१ जानेवारी १९३७ रोजी त्यांचा जन्म मध्यप्रदेशमधील राजनंदगाव येथे झाला. ते कृषी पदवीधर होते.काही काळ त्यांनी मध्यप्रदेशच्या शेती खात्यात काम केले. नंतर ते कृषी महाविद्यालय व कृषी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करू लागले. वयाच्या विशीत त्यांना थोर कवी गजानन माधव मुक्तीबोध भेटले. मुक्तीबोध यांनी शुक्ल यांच्या कवितेचे वेगळेपण ओळखलं होतं.ग्रामीण जीवन अतिशय जवळून अनुभवलेल्या शुक्ल यांच्या लेखनामध्ये ग्रामीण जीवनाचे सूक्ष्म पदर दिसून येतात. शेतकरी, कष्टकरी, आदिवासी , कुपोषित, बेरोजगार,कामगार, नोकर, शिक्षक, छोटा व्यापारी अशी सर्वसामान्य पात्रे त्यांच्या साहित्यात आढळतात. मात्र या सर्वसामान्य पात्रांच्या माध्यमातून विनोद कुमार शुक्ल असामान्य असे संवेदनशील लेखन करतात.


एका कवितेत ते लिहितात,

मैं अंतर्मुखी होकर कविता में अपने को एक वाक्य देता हूँ—

कि चलो निकलो।

इस वाक्य में बाहर देना भूल जाता हूँ।

इसलिए अपने अंदर और निकल जाता हूँ।

अंतर्मन के तालाब में

बहिर्मुख के प्रतिबिंब को

अंतर्मुख देखता हूँ।

बहिर्मुख की दाढ़ी बनाता हूँ।

बहिर्मुख को धोकर

अंतर्मुख साफ़ देखता हूँ।

तैयार होकर बाहर

परंतु अंतर्मुख के साथ निकल आता हूँ

खुली हवा में उसी से साँस लेता हूँ।


त्यांच्या कवितेची नायिका असलेल्या आदिवासी मुलींला घनदाट जंगलामध्ये वाघासारख्याही हिंस्त्र प्राण्याची भीती वाटत नाही. मात्र तिला फुलं घेऊन बाजारात विकायला जाण्याची भीती वाटते. ती जंगलात फिरत असताना वाघही तिला पाहतो.तिला पाहून वाघ नेहमीप्रमाणे जांभई देत पडून राहतो. दोघेही आपापल्या कामात एकमेकाला अडथळा न मानता व्यस्त असतात. पण ही जंगलातील निर्भयता त्या मुलीला गावात बाजारात येताना भयभीत करीत असते.

" गंदगी वहाँ है जहाँ सफ़ाई और संपन्नता है, वह अहाता है जहाँ से फूलों की ख़ुशबू आती है और घास पर बैठे हुए वे लोग हैं जो फ़ुर्सत से बैठ गए हैं " हे त्यांचे काव्य विधान अनेक अर्थानी महत्त्वाचे आहे.


एका कवितेत ते विषमतेवर भाष्य करताना म्हणतात, हॉटेलात तंदूर मध्ये तयार होणारी रोटी सगळ्यांनाच मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे सर्वांच्या घडाळ्याचे काटे दाखवीत असलेली वेळ जरी सारखी असली तरी ती वेळ सर्वांच्या वाट्याला सारखीच येत नसते. आदिवासींना जंगलातून बेदखल करणे म्हणजे कवितेतून एक एक शब्द बे दखल होण आहे असं ते मानतात.त्यांच्या लेखनामध्ये प्रतीके, रूपके यांचा अतिशय चफकलपणे वापर केलेला दिसून येतो. अतिशय श्रेष्ठ दर्जाची साहित्य निर्मिती करणारे विनोद कुमार शुक्ल एके ठिकाणी म्हणतात, " आतापर्यंत जे आपण लिहिलं ते श्रेष्ठ नाही असच समजून आपण चाललं पाहिजे. कोणताही लेखक त्याच्या आयुष्यातलं सर्वश्रेष्ठ लेखन करत नसतो. तो पुन्हा पुन्हा लिहितो त्याचं कारण ही तेच असतं. आपण लिहिलेलं वजा करून सर्वश्रेष्ठ असे लिहिण्याची जबाबदारी येणाऱ्या पिढ्यांची आहे असं मला वाटतं."


विविध कुमार शुक्ल  गेली जवळजवळ सत्तर वर्षे लिहीत आहेत.लगभग जयहिंद (१९७१)वह आदमी चला गया नया गरम कोट पहिनकर विचार की तरह' (१९८१),सब कुछ होना बचा रहेगा(१९९२) ,अतिरिक्त नहीं (२०००) ,कविता से लंबी कविता(२००१) ,आकाश धरती को खटखटाता है (२००६)पचास कविताएँ' (२०११)कभी के बाद अभी (२०१२)कवि ने कहा ' -चुनी हुई कविताएँ (२०१२),प्रतिनिधि कविताएँ (२०१३), एक पूर्व मे बहुत से पूर्व (२०२३) हे कविता संग्रह,तरनौकर की कमीज़ (१९७९),खिलेगा तो देखेंगे (१९९६),दीवार में एक खिड़की रहती थी (१९९७),हरी घास की छप्पर वाली झोपड़ी और बौना पहाड़ (२०११),यासि रासा त (२०१७),एक चुप्पी जगह' (२०१८) या कादंबऱ्या प्रकाशित आहेत. तसेचपेड़ पर कमरा (१९८८),महाविद्यालय (१९९८),एक कहानी (२००७),घोड़ा और अन्य कहानियाँ (२०२१) हे कथासंग्रह ही प्रकाशित आहेत. त्यांच्या साहित्यावर अनेकांनी पुस्तके लिहिली आहेत.त्यांच्या नौकर की कमीज़  या कादंबरीवर  फ़िल्मकार मणी कौल यांनी त्याच नावाचा चित्रपट बनवला होता. तसेच त्यांच्या साहित्यावर इतरही काही लघुपट,चित्रपट निर्माण झाले.तर  दीवार में एक खिड़की रहती थी  या कादंबरीला अकादमी पुरस्कार मिळाला होता. तसेच इतरही अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.त्यांनी बालसाहित्यही लिहिले आहे. त्यांच्या साहित्याचे विविध भाषात अनुवादही झाले.एवढं वैविध्यपूर्ण व प्रचंड लेखन करूनही ज्ञानपीठ जाहीर झाल्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले,'  खरंतर मला खूप लिहायचं होतं.पण मी फार कमी लिहू शकलो. आपल्या आयुष्याचा पाठलाग लेखनाच्या माध्यमातून करावा असं मला सारखं वाटतं.पण आयुष्य फार वेगाने कमी व्हायच्या दिशेने चालले आहे आणि त्या तुलनेत लिखाणाचा वेग मात्र मी तेवढा वाढवू शकत नाही.'


प्रार्थना या कवितेत ते लिहितात,

ईश्वर,

ध्यान देना…

जब खड़ा होना पड़े मुझे

तो अपने अस्तित्व से ज़्यादा जगह न घेरूँ।

मैं ऋग्वेद के चरवाहों कि करुणा के साथ कहता हूँ—

मुझे इस अनंत ब्रह्मांड में

मेरे पेट से बड़ा खेत मत देना,

हल के भार से अधिक शक्ति,

बैल के आनंद से अधिक श्रम मत देना।

मैं तोलस्तोय के किसान से सीख लेकर कहता हूँ :

मुझे मत देना उतनी ज़मीन

जो मेरे रोज़ाना के इस्तेमाल से ज़्यादा हो,

हद से हद एक चारपाई जितनी जगह

जिसके पास में एक मेज़-कुर्सी आ जाए।

मुझे मेरे ज्ञान से ज़्यादा शब्द,

सत्य से ज़्यादा तर्क मत देना।

सबसे बड़ी बात

मुझे सत्य के सत्य से भी अवगत करवाना।

मुझे मत देना वह

जिसके लिए कोई और कर रहा हो प्रार्थना।


साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठीतील ख्यातनाम लेखक आसाराम लोमटे यांनी दैनिक लोकसत्तात शनिवार ता.२९ मार्च २०२५ रोजी विनोद कुमार शुक्ल यांच्या साहित्याचा परिचय करून देणारा एक लेख लिहिला आहे. त्यात ते म्हणतात,' विनोदजी कवी म्हणून श्रेष्ठ आहेतच.पण त्यांच्या कादंबऱ्यांची मौलिकताही तेवढीच आहे .या दोन्ही साहित्य प्रकारावर त्यांची खास अशी मुद्रा आहे.नजरेच्या एका टप्प्यात मोठ्या पटलावरच दृश्य दिसावं पण त्या दृश्यात झळाळणार, अद्भुत चमकणार काहीतरी चटकन नजरेत यावं अशी ही कविता आहे. एखादी गोष्ट क्षणिक चकाकून जावी आणि अदृश्य व्हावी. पण ती अनुभूती मात्र कायम आपल्याजवळच राहावी अशी जादू या कवितेत आहे. गद्य ओबडधोबड असत पण कवितेचा तसं नाही .कवितेत एक सघनता असते. गद्य लिहायला घेता येतं पण असं कवितेच्या बाबतीत होत नाही. त्यांच्या शब्दात आणखी स्पष्ट करून सांगायचं झालं तर 'गद्य एक बहाना आहे कविता लिखने का '...खळाळत्या प्रवाहासारखी विनोदजींची कविता वाहती आहे . तिच्यात सहजता आहे. मानवी संबंधामधील ओल कायम टिकावी यासाठी ही कविता माणसाच्या अस्तित्वाशी जोडलेल्या आकांक्षांचा वेध घेते. मानवी जीवनासंबंधीची कमालीची आस्था हा या कवितेचा विषय आहे.' मुझे बचाना है एक एक कर अपनी प्यारी दुनिया को ' ही या कवितेची आशा आहे. या कवितेच्या साधेपणात एक विलक्षण सौंदर्य आहे आणि वाचकाला स्तिमित करण्याचा सामर्थ्यही.' आजकाल में उठने के लिए सिर्फ नींद पर भरोसा करता हु ''अपने हिस्से मे लोक आकाश देखते है ''परछाई को नदी के पानी मे तैरना आता है ' या वेगवेगळ्या कवितांमधल्या काही ओळींवरूनही त्याची प्रतीची येईल."


सबसे गरीब आदमी या कवितेत ते लिहितात,

सबसे ग़रीब आदमी की

सबसे कठिन बीमारी के लिए

सबसे बड़ा विशेषज्ञ डॉक्टर आए

जिसकी सबसे ज़्यादा फ़ीस हो

सबसे बड़ा विशेषज्ञ डॉक्टर

उस ग़रीब की झोंपड़ी में आकर

झाड़ू लगा दे

जिससे कुछ गंदगी दूर हो।

सामने की बदबूदार नाली को

साफ़ कर दे

जिससे बदबू कुछ कम हो।

उस ग़रीब बीमार के घड़े में

शुद्ध जल दूर म्युनिसिपल की

नल से भरकर लाए।

बीमार के चीथड़ों को

पास के हरे गंदे पानी के डबरे

से न धोए।

कहीं और धोए।

बीमार को सरकारी अस्पताल

जाने की सलाह न दे।

कृतज्ञ होकर

सबसे बड़ा डॉक्टर सबसे ग़रीब आदमी का इलाज करे

और फ़ीस माँगने से डरे।

सबसे ग़रीब बीमार आदमी के लिए

सबसे सस्ता डॉक्टर भी

बहुत महँगा है।


'डोळे बंद करून आंधळ्याची दृष्टी मिळवता येत नसते ' असं सार्वकालिक सत्य सांगणाऱ्या विनोद कुमार शुक्ल याना ज्ञानपीठ मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र या निमित्ताने एक गोष्ट सांगावीशी वाटते ,बहुतांश लेखक कलावंतांचं सर्वोत्तम लेखन हे त्यांच्या वयाच्या सत्तरीच्या आत झालेल असतं. त्यामुळे ज्ञानपीठ सारखे सन्मान किंवा साहित्य संमेलनाची अध्यक्षपद ही त्यांच्या सत्तरीच्या आसपासच मिळायला हवीत. त्यामुळे त्या व्यक्तीला तर आनंद होईलच पण त्याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक भवतालही अधिक समृद्ध व सकस बनेल.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post