प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळ : डायरेक्ट पैसे खाल्लेलं समोर येऊन ही पोलीस फिर्याद घ्यायला तयार नाहीत म्हणून आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करावी म्हणून मागणी केली आहे व त्यात आमचे दोन कार्यकर्ते घ्यावेत या मागणीवर घोडं अडलं आहे.आंदोलन अंकुश चे कार्यकर्ते चौकशी समितीत घेतले तर सगळा घोटाळा बाहेर काढतील आणि नगरपरिषद चे सगळेच अधिकारी जेल मध्ये जातील म्हणून नगरपरिषद सखोल चौकशीला तयार नाही. नागरिकांचे लाखो रुपये हडप करून देणार नाही म्हणून अक्षय पाटील याचे दुसऱ्या दिवशी पण आमरण उपोषण सुरूच आहे.
भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शिरोळ नगरपरिषद विरोधात आज सकाळी 11 वाजता बोंब ठोको आंदोलन होणार आहे.
आंदोलन अंकुश संघटना
शाखा शिरोळ