श्री सुधीर नाईक यांना राष्ट्रीय आदर्श समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

सांगली जिल्हा प्रतिनिधी : अशोक मासाळ.

पुणे येथील पत्रकारिता क्षेत्रातील आघाडीचे वृत्तसंस्था प्रेस म्हणून मीडिया लाईव्ह च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर येथे शाहू स्मारक भवन येथे दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी बारा ते तीन या वेळेत संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र कर्नाटक कोकण येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी एकूण 65 विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले. 

सांगली जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणारे श्री सुधीर नाईक समाज रत्न पुरस्कार, श्री अशोक मासाळ राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्कार,व संजय पवार आदर्श पत्रकार, राजेंद्र कोष्टी आदर्श शिक्षक पुरस्कार, संजय यादव क्रीडारत्न पुरस्कार, सौ सुनीता शिंगाडे आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार ,यांना आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल प्रेस मीडिया लाईव्ह पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय आदर्श पुरस्कार 2025 चा देऊन गौरविण्यात आला. 

हे सर्व पुरस्कार ऍड श्री मा आयुब शेख माजी नगरसेवक पुणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले यावेळी मुख्य संपादक संस्थापक अध्यक्ष श्री महबूब धसर्जेखान प्रेस मीडिया लाईव्ह पुणे उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून मराठी चित्रपट अभिनेत्री पद्मजा खटावकर ,शांताई संस्थेचे अध्यक्ष सौ व श्री बापूसाहेब कांबळे पुणे ,वरिष्ठ पत्रकार फिरोज मुल्ला पुणे ,अल्फाज टाइम्सचे मुख्य संपादक राजे खान पटेल पुणे, दैनिक गगन ताराचे संपादक सुभाष भिके कोल्हापूर ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

वरील साही पुरस्कारांचे सांगली मिरज शहरात कौतुक व अभिनंदन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post