मुस्लिम समाजाच्या पाठीशी रिपाई (सचिन खरात गट )खंबीरपणे उभा.. राष्ट्रीय अध्यक्ष सचिनभाऊ खरात




प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे (औंधरोड बोपोडी )... "ईद मिलन कार्यक्रम " रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट )या पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आला या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे  रिपाई (सचिन खरात गट )या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सचिनभाऊ खरात, मार्गदर्शक  जेष्ठ विचारवंत मा. डॉ.कुमार सप्तर्षी साहेब, "चल हल्ला बोल "चित्रपटचे दिग्दर्शक मा. महेश बनसोडे, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या महिला प्रदेशाध्यक्षा गौसिया खान हे मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम रिपाई (सचिन खरात गट )पक्षाचे मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य मा. फिरोज मुल्ला (सर )यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. मान्यवरांचा सत्कार स्वागताध्यक्षा सौं शकीलाताई मुल्ला यांनी केला या कार्यक्रमाचे आयोजन संदीपभाऊ शेंडगे यांनी केले 

रिपाई खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिनभाऊ खरात यांचा जाहीर सत्कार मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आला व त्यांच्या मनोगतात म्हणाले या भारत देशातील मुस्लिम आपले बांधव आहेत परंतु काही जातीयवादी संघटना लोक जाणीवपूर्वक देशात अशांतता पसरवन्याकरिता मुस्लिम समाजाला टार्गेट करत आहेत त्यांच्यावर हल्ले करणे धार्मिक द्वेष करणे संविधानिक हक्कापासून मुस्लिमांना वंचीत ठेवणे हे पद्दतशीर चालू आहे सच्चर समितीची अंमलबजावणी     केली जात नाही त्यांना मुख्य प्रवाहत आणलं जात नाही शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, क्षेत्रात कमजोर केले जात आहे हे या देशात काय चाललं आहे मुस्लिम समाज आपल्या देशाचा ऐक भाग आहे सर्व जातीधर्माला न्याय मिळाला पाहिजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे "शिका संघटित व्हा संघर्ष करा "ही भूमिका बहुजन समाजाने घेतली पाहिजे आणि ऐक झालं पाहिजे आणि सर्व भारतवासियांना ईदच्या शुभेच्छा देऊन सचिनभाऊ खरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले 

यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे ट्रस्टचे अध्यक्ष तुषार मोहिते,स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष जीवन घोंघडे,रिपाई (सचिन खरात गट )पक्षाचे प्रदेश सचिव व पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय चोपडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व पुणे शहर अध्यक्ष राजाभाऊ कांबळे, पुणे शहर उपाध्यक्ष अशोक पवार,पुणे शहर युवक उपाध्यक्ष अक्षय कटके, कोल्हापूर कामगार आघाडी शहर अध्यक्ष तानाजी शिंदे, उपाध्यक्ष दिलीप कुदळे, सेक्रेटरी दिनकर थोरात,जनहित जागृती मंचाचे अध्यक्ष विजय जगताप,युसूफभाई सय्यद, आरिफभाई शेख, अस्लमभाई वाटरे, राजेश रेड्डी,शहीदभाई मुजावर, साजिदभाई सय्यद, आलिभाई सय्यद, मुक्तारभाई माणियार, अल्ताफभाई शेख,प्रवीण चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते  युसूफभाई सय्यद, आरिफभाई शेख, अस्लमभाई वाटरे, राजेश रेड्डी,शहीदभाई मुजावर, साजिदभाई सय्यद, आलिभाई सय्यद, मुक्तारभाई माणियार, अल्ताफभाई शेख,प्रवीण चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post