-रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाई व्हावे समिती नेमुन चौकशी करावे रुग्णालय प्रशासनावर स्वतंत्र यंत्रणे मार्फत चौकशी करावी :- राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी.
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
पुणे दि. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा हलगर्जीपणामुळे गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे मुजोरपणा व अडमोट धोरणामुळे एक निष्पाप गर्भवती महिलेचे पैसे अभावी मृत्यू झाले तसेच शासनाच्या वतीने निधी उपलब्ध होत असताना पैशाची मागणी करून आपला अडमोठ पणा दाखविला आहे आता याप्रकरणी राज्य मानवी आयोगात ह्यूमन राईट्स फॉर प्रोटेक्शनच्या वतीने याचिका दाखल केल्याचे ह्यूमन राईट्स फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी चौधरी यांनी द प्रेस मीडिया लाईव्ह या वृत्त वाहीनीचे प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे यांना माहिती देताना दिली दिनांक ३ अप्रैल रोजी गर्भवती महिला उपचार घेण्यासाठी गेले असता उपचारासाठी १० लाख रुपये भरण्या साठी सांगितले जो पर्यंत पैसे भरणार नाही तो पर्यंत उपचार होणार नाही अशी भूमिका घेतल्याने व वेळेवर उपचार न झाल्याने इतर रुग्णालयात दाखल केले असता अधिक रक्तस्राव झाल्याने गर्भवती महिलेचे मृत्यू झाले ही घटना मानवी हक्कास काळीमा फासणारी घटना आहे या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे पुर्णपणे जबाबदार आहे तसेच प्रशासन ही या गोष्टीला जबाबदार आहे म्हणून रूग्णालय व प्रशासन वरती कठोर शासन व्हावे रुग्णालय प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा दाखल करून स्वतंत्र यंत्रणे मार्फत चौकशी करावी यासाठी ह्युमन राईट्स फाॅर प्राॅटेक्शन वतीने राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी यांनी राज्य मानवी हक्क आयोग कडे प्रशासनाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. -
राज्यात १०० पेक्षा जास्त धर्मदाय रुग्णालय असुन पुण्यात रुबी हॉल क्लिनिक जहांगीर हॉस्पिटल के ई एम हॉस्पिटल सह्याद्री मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल भारतीय आयुर्वेदिक हॉस्पिटल संजीवनी हॉस्पिटल लोकमान्य हॉस्पिटल दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अशी महत्त्वाचे रुग्णालय आहेत तसेच सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी हे देखील धर्मदाय आयुक्त कडे नोंदीत आहे
-आता राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी याबाबत कडक पाऊल उचलले आहे जेवढे धर्मदाय रुग्णालय आहेत त्यांनी रुग्णालयात मोठे फलक लावण्याचे सुचना दिले आहे या बाबत नागरिकांनी तक्रार दाखल करावे असे आवाहन देखील राज्य महिला आयोग रुपाली चाकणकर यांनी केली आहे.