प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : वक्फ बिल विरोधात आंदोलन केले तर जालियनवाला बाग करू 'असे उद्गगार काढणाऱ्या संजय निरुपम यांच्या विरोधात कारवाई करावी,अशी मागणी करणारे निवेदन कोंढवा पोलिस स्टेशन येथे अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी आणि इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप या संस्थेच्या वतीने देण्यात आले .
दि. ७ एप्रिल २०२५ रोजी कोंढवा येथील अल्पसंख्याकांच्या वतीने कोंढवा पोलीस स्टेशन येथे संजय निरुपम यांच्यावर असंवेदनशील तथा भडकावू तसेच देशातील अल्पसंख्याक घटकांना धमकावणाऱ्या उद्गगाराबाबत कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले . निरुपम यांनी संविधान अनुच्छेद १९ तथा २१ चे हनन करून संविधान अनुच्छेद १४ चे देखील उल्लंघन केलेले असून याच्यावर सामाजिक अशांतता तसेच अल्पसंख्याक यांना धमकावणे तसेच भडकावू ,अतिरेकी उद्दगाराबद्दल युएपीए कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी वरीष्ठ पोलिस निरीक्षक विनायक पाटणकर यांना केली.
या वेळी अल्पसंख्याक समाजाचे तसेच इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप चे अध्यक्ष असलम इसाक बागवान,पुणे शहर काँग्रेस महिला आघाडी चिटणीस कांचन बलनाईक, इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप चे शहर अध्यक्ष राजू सय्यद,आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आसीफ बागवान,एस डी पी आय चे पदाधिकारी दिलावर सय्यद, सामाजिक कार्यकर्ते माहिभाई शेख तसेच रहमत सोशल फाऊंडेशन अध्यक्ष अब्दुल बागवान उपस्थित होते.
महाराष्ट्रात संजय निरुपमवर प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्याचे आवाहन असलम इसाक बागवान यांनी अल्पसंख्याक समाजास केले.शिवाय अल्पसंख्याक समुदायाने वक्फ बिलाला समर्थन करणाऱ्या,मतदानास गैरहजर राहिलेल्या संसद सदस्याना पक्षातून राजिनामा देण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.
.