प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी येथील मध्यवस्तीतील बेनकर मळ्यातील पारी कंपनी जवळील दुर्घटनाग्रस्त कचरा विलिनीकरण प्रकल्प बंद करण्याच्या मागणीसाठी आज गुरुवारी (१७) रणरणत्या उन्हात हजारो संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले.जो पर्यंत कचरा प्रकल्प बंद होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पोकळे, आम आदमी पक्षाचे धनंजय बेनकर ,निलेश दमिस्टे ,सनी रायकर ,गंगाधर बडावळे, बापू पोकळे, सचिन बेनकर , बाळासाहेब नारायण बेनकर तुषार पोकळे ,अजय बेनकर ,मकरंद जोशी, सपना राऊत,
रंजीत जाधव, शैलेश कुलकर्णी, गुलाब बेनकर, सुनिल गदगे, सुजाता कोळपे, अविनाश चांदेकर, विश्वास राऊत,मेघा शेळके आदींसह यश प्लेटियम,साई श्रेया, शिवप्रभा, व्यंकटेश शार्विल आदी सोसायटीतील रहिवाशी आंदोलनात सहभागी झाले होते...
आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, गार्डन साठी आरक्षित केलेल्या जागेवर पालिकेने गैर मार्गाने मध्यवस्तीत कचरा प्रकल्प उभारला त्यामुळे येथील हजारो रहिवाशांवर दुर्घटनांची टांगती तलवार उभी आहे. असे असताना पालिकेने ठेकेदाराला प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे
कचरा प्रकल्पामुळे दुर्गंधी, डांस माशांचा उपद्रव वाढला आहे त्यामुळे रोगराई पसरली आहे. नागरिकांना घराचे दरवाजे खिडक्या बंद कराव्या लागत आहेत अनेक नागरिक प्लॅट,घरे सोडून दुसरीकडे राहण्यास गेले आहेत. या परिसरात निम्म्याहून अधिक प्लॉट रिकामे आहेत. विहीरी, बोअरवेलचे पाणी दुषित झाले आहे. या बाबत चार पाच वर्षांपासून तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही.
प्रकल्पा शेजारील नैसर्गिक ओढ्यांचे पाणी विषारी झाले आहे. याकडे प्रदुषण महामंडळाने डोळेझाक केली आहे. खाजगी ठेकेदाराच्या बेफिकीरीमुळे गेल्या महिन्यात भिषण आगीत कचरा विलिनीकरण प्रकल्प जळुन खाक झाला. प्रकल्पातील कामगार गावी गेल्याने सुदैवाने कोणी मृत्यूमुखी पडले नाही. ठेकेदाराने पालिकेच्या नियम अटी धाब्यावर बसवल्या आहेत. असे सांगून धनंजय बेनकर पुढे म्हणाले,
मुंबई महापालिका अधिनियम कायद्यानुसार लोकवस्तीच्या पाचशे मीटर दूर अंतरावर कचरा विलिनीकरण प्रकल्प असावा असा नियम आहे याकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने दाट लोकवस्तीच्या मध्यभागी प्रकल्प उभारला आहे . प्रकल्प सुरू झाल्या पासून सातत्याने या प्रकल्पाला भीषण आगी लागत आहे
प्रशासनाने तातडीने प्रकल्प बंद करुन दुसऱ्या जागी जो पर्यंत स्थलांतरित केला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले.