पूना कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पूना कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, कॅम्प, पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय सेवा योजना (+2), राष्ट्रीय कैडेट कोर (NCC), व विद्यार्थी विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमांचे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. इकबाल शेख आणि उपप्राचार्य डॉ. इम्तियाज आगा यांनी केले. सर्व कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने झाली. NSS, NSS +2 व NCC च्या स्वयंसेवक व कॅडेट्सनी "राष्ट्रीय एकात्मता" व "बंधुत्व" यांचा संदेश देत कॅम्प, एमजी रोड परिसरात प्रभात फेरी काढली. त्यानंतर वेस्टर्न कॉर्नर जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.  

या प्रसंगी भारताचे संविधान उद्देशिकेचे  यावेळेस वाचन करण्यात आले त्यानंतर प्रा. डॉ. बाबा शेख यांनी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान" या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी भारतीय संविधान, राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती, व नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्य यावर विचार मांडले.

कार्यक्रमात NCC व NSS च्या विद्यार्थ्यांनी "हम सब एक हैं" असा संदेश देणारी मानवी साखळी तयार केली. या माध्यमातून बंधुत्व व सामाजिक जागृतीचा संदेश देण्यात आला. यानंतर सर्व उपस्थित नागरिकांना NSS स्वयंसेवकांच्या वतीने थंडपेय व मिठाईचे वाटप करण्यात आले.

 प्राचार्य डॉ. इकबाल शेख, डॉ. बाबा शेख, ले. डॉ. शाकीर शेख, डॉ. इरम खान,डॉ. अकबर सैयद (NSS कार्यक्रम अधिकारी), सौ. वसुधा व्हावळ (कार्यक्रम अधिकारी), प्रा. अशद शेख, तसेच शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवक यांनी यशस्वी करण्यात मेहनत  घेतली.

उपप्राचार्य डॉ. अमजद शेख, उपप्राचार्य डॉ. इम्तियाज आगा, पर्यवेक्षिका नसीम खान, रजिस्ट्रार इस्माईल सय्यद, जिमखाना निदेशक डॉ. अय्याज शेख, कार्यक्रम अधिकारी प्रा. अशद शेख, प्रा. वसुधा व्हावळ,  प्रा. जुबेर पटेल ,सलमान सय्यद व इतर मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय ठरली.

Post a Comment

Previous Post Next Post