राष्ट्रीय मजदुर संघचे अध्यक्ष सुनिल शिंदे यांची शिष्टमंडळासह कामगार उपआयुक्त कार्यालयात बैठक,
काय आहेत मागणी सविस्तर बातमी पहा. -
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
पुणे दि. :- पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळासह कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित प्रश्न व सुरक्षा रक्षकांचे अनेक विविध प्रश्नांसाठी राष्ट्रीय मजदुर संघ सघटनेची बैठक कामगार आयुक्त कार्यालय संगमवाडी येथे कामगार उपायुक्त तथा पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष अभय गीते यांच्या दालनात बैठक घेण्यात आली या बैठकीत राष्ट्रीय मजदुर संघचे संस्थापक अध्यक्ष सुनिल शिंदे हे आपल्या शिष्टमंडळासह कामगार उपायुक्त तथा पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष यांच्या दालनात विविध प्रश्न मांडुन बैठक पार पाडली.
या बैठकीत राष्ट्रीय मजदुर संघचे संस्थापक अध्यक्ष सुनिल शिंदे यांनी सुरक्षा रक्षकांच्या विविध प्रश्न मांडुन मागणी केली.
काय आहेत मागणी....
१)मुंबई सुरक्षा रक्षक मंडळा प्रमाणे पुणे जिल्हा सुरक्षा रक्षकांचा पगार समान असावा २) अनेक सुरक्षा रक्षकांचे खाते हे दुसरे बॅंकेत असुन सुरक्षा रक्षकांचे पुर्वी बँक ऑफ इंडिया शाखेत होते ते खाते बंद करण्यात आले होते अनेक सुरक्षा रक्षकांचे तक्रारी आल्याने सुरक्षा रक्षकांचे खाते हे बॅंक ऑफ इंडिया मध्येच परत चालू करावे आणि ज्या सुरक्षा रक्षकांना आपले खाते बॅंक ऑफ इंडिया मध्ये चालू ठेवायचे आहे त्यांनी मंडळाकडे अर्ज करावा त्यांचे खाते परत तेथेच ठेवण्यात येईल.
३) पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांसाठी ईएसआयसी चे मार्गदर्शन शिबिर आयोजन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला यासाठी मंडळाच्या वतीने सहमती दर्शवली याबाबत लवकरच मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार.
४) कामगार कायद्याप्रमाणे अधिक तास काम केले तर सुरक्षा रक्षकांना दाम दुप्पट दराने मिळावा.
५) पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात काम करीत असलेल्या सुरक्षा रक्षकांना पदोन्नती देण्यासाठी स्वतंत्र नियमावली संघटनेला विश्वासात घेऊन तयार करावा.
६) सुरक्षा रक्षकांना निवृत्ती वेतन लागू करावे
७)सुरक्षा रक्षकांचे पगारवाढ प्रत्येक दोन वर्षांनी पगारवाढ करावी.
अशा सर्व विविध विषयांवर सकारात्मक चर्चा कामगार उपायुक्त तथा पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष अभय गीते यांच्या दालनात झाली.
या बैठकीत राष्ट्रीय मजदुर संघ संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे प्रतिनिधी सतीश सगर, समाधान मिसाळ, उल्हास बोडके व मायकल अलेक्सझंडर आदि उपस्थित होते.