गर्भवती महिला हे आमदाराचे स्वीय सहायकाची पत्नी गर्भवती महिलेचे मृत्यू झाल्यानें संताप व्यक्त.
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
पुणे :- पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे येथील संस्कृती जगविख्यात आहे असे सांस्कृतिक राजधानी मध्ये एखाद्या गर्भवती महिलेचे पैसे आभावी जर जीव जात असेल तर ते संस्कृती काय कामाचे सामाजिक जाणीवा असलेल्या पुण्यातील नावलौकिक असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेचे पैसे न भरल्याने जीव गमवावे लागले आहे अनेक योजना शासनामार्फत सुरू केले गेले आहेत आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले योजना असुन देखील काहीच उपयोगाचे नसल्याचे दिसून आले आहे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर या धर्मादाय नोंदणी असलेल्या रुग्णालयातच रुग्णसेवेला तडा गेला असून गर्भवती महिलेवर वेळीच उपचार न केल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे मान खाली घालविण्याचे वेळ पुणे सारखें संस्कृत शहराला आले आहे एका गर्भवती महिलेला पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करते वेळी अगोदर १० लाख रुपये भरावे, त्यानंतरच दाखल केले जाईल अशा पवित्रा रुग्णालय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे, संबंधित महिलेला दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी, प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले. मात्र, दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर दुर्दैवाने महिलेचा मृत्यू झाला. या घटनेवरुन आता सर्वत्र संताप व्यक्त होत असून आमदार अमित गोरखे यांनीही याप्रकरणी पोलिसात धाव घेतली आहे.तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांकडे १० लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. अखेर अडीच लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही. परिणामी तिला इतर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला. या महिलेचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नाहीत म्हणल्यावर दीनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला. तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचं ऐकलं नाही. परिणामी गर्भवती महिलेने दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला मात्र महिलेचा जीव गमावला. या घटनेबाबत आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली आहे.
"आमदाराची पोलिसात धाव", --
गोरखे यांनी घेतली पुण्याचे सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन महिला भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गोरखे यांनी घटनेचा सर्व वृतांत सविस्तर पोलीस उपायुक्त रंजन शर्मा यांना सांगितला. त्यानंतर, योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात येईल असे, आश्वासन शर्मा यांनी आमदार गोरखे यांना दिले आहे. आता पोलीस कसं प्रकारे व कसे कडक कारवाई करतील याकडे पुणेकरांचे लक्ष लागून आहे