प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : जम्मू कश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला केला असून यात किमान 26 लोक मृत पावले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. हा हल्ला देशाच्या एकता व अखंडतेवरील असल्याने याचा तीव्र निषेध नोंदवण्यात येऊन यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी उद्या शुक्रवार दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी6:30 वाजता पुणे कॅम्प भागातील अरोरा टॉवर हॉटेल समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे कॅन्डल मार्च व तीव्र निदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहेत.
नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतिने आयोजित या आंदोलनात विविध सामाजिक संस्था , संघटना व पक्षाचे प्रतिनिधी सहभागी होणार असून यावेळी मुस्लिम , ख्रिश्चन, बौद्ध यांसह इतर अल्पसंख्याक समाजातील लोक उपस्थित राहून आपला निषेध व्यक्त करणार आहेत.
नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी