ईद , गुढी पाडवा मिलन कार्यक्रमास चांगला प्रतिसाद



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप च्या वतीने आयोजित ईद , गुढी पाडवा मिलन कार्यक्रमास २ एप्रिल रोजी चांगला प्रतिसाद मिळाला.कोंढवा कोणार्क पुरम गेट समोर सकाळी साडे दहा वाजता  हा कार्यक्रम सामाजिक स्नेह वृध्दिंगत करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आला.संयोजक असलम इसाक बागवान यांनी प्रस्ताविक केले.

सामाजिक कार्यकर्ते समीर पठाण ,जेष्ठ समाजसेवक छबिलभाई पटेल यांचा सत्कार करण्यात  आला.संविधानाच्या उद्देशिकेचे वाटप करण्यात आले

'हम भारत के लोग'च्या माध्यमातून या कार्यक्रमात शिरखुर्मा, गाठी , बुंदी वाटप करण्यात आले.विविध नाट्य, पथनाट्य तथा विविध सामाजिक सलोख्याचे संदेश देण्यात  आले .

 सफाई कर्मचारी गट, अल्पसंख्याक महिला तथा पुरूष गट,तसेच पुणे शहरातील कार्यकर्ते दिपक जाधव,दिपक कसाळे,लताताई भिसे, मिलिंद चव्हाण ,योगेश हुप्परीकर, राम,नितिन यांनी संयोजन केले. संदीप बर्वे, इब्राहिम खान, सचिन आल्हाट, शोएब नदाफ, इब्राहिम शेख, नवनाथ कांबळे, आयेशा पटेल, कपिल क्षीरसागर, माथाडी कामगार, सफाई कामगार, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post