प्रेस मीडिया लाईव्ह :
विश्वरत्न,परमपूज्य,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती चांदणी चौक, आप्पा कासार झोपडपट्टी, माळी थिएटर जवळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक ठिकाणी साजरी करण्यात आली. या वेळेला प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांच्या हस्ते फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळेला मा.प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की आज या चांदणी चौक परिसरात अण्णाभाऊ साठे स्मारक ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर केंगार यांनी सामाजिक भान ठेवून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असतात या वेळेला त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो बरोबर छत्रपती शाहू महाराज,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे ,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महापुरुषांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याची सुरुवात येथून झाली आहे त्यामुळे हा नवीन उपक्रम आहे.तसेच या भागातील गोरगरीब घराण्यातली मुलांना चांगले शिक्षण द्यावे तसेच पालकांना कितीही अडचणी आल्या तरी मुलांना शिक्षणासाठी काहीही कमी पडू देऊ नका. एक वेळ तुम्ही जेवण करू नका, देवाला नारळ फोडू नका बकऱ्याचा बळी देऊ नका ,परंतु मुलांना शिक्षण देताना कुठेही कमी पडू नका त्यांच्यावर चांगले संस्कार करा आणि मुलांना भविष्यकाळातील उत्तम नागरिक बनवा. भारतरत्न विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कायम प्रेरणास्थानी ठेवून मुलानेअभ्यास करावा आणि जीवनात वेगवेगळ्या टप्प्यावरती प्राविण्य मिळवावे आणि यश संपादन करावे असे मनोगत मा. प्रवक्ते संतोष पाटील यांनी जयंतीच्या वेळेला केले
यावेळेला प्रवक्ते संतोष पाटील यांच्या हस्ते शाळेत जाणाऱ्या मुले व मुलींना वह्या, पुस्तके, पेन खोड रबर, व इतर शालेय साहित्य देऊन मुलांना शिक्षणासाठी प्रेरित केले. या वेळेला या भागातील गोरगरीब मुलांना मदत करणारे व त्यांच्या मदतीला धावून जाणारे ज्ञानेश्वर केंगार यांनी सर्वांचे स्वागत करून सत्कार केला, या वेळेला आमसिद्ध कट्टीमनी,महावीर पाटील,बाबा वाडीकर,मारुती ऐवळे,आदर्श केंगार,विश्वजीत पाटील,गजानन मोरे,गोटू सूर्यवंशी सर व इतर अनेक जण उपस्थित होते