प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
पुणे : पुणे येथील पत्रकारिता क्षेत्रातील सर्वात आघाडीचे वृत्तसंस्था द प्रेस मीडिया लाईव्ह चा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर येथे २२एप्रिल २०२५ रोजी शाहू स्मारक भवन येथे भव्य दिव्य स्वरूपात दुपारी १२:०० ते ३:०० या वेळेत प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.. एकूण 50 मान्यवरांना पुरस्कार देण्यात येणार आहे.
या वेळी महाराष्ट्र कर्नाटक कोकण येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांची निवड करून त्यांना विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात येणार आहे..या कार्यक्रमाचे प्रायोजक पुणे येथील लोकसेवा करणारे माजी नगरसेवक अँड .मा. अय्युब शेख हे आहेत पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आलेल्या मान्यवरांना अल्पोपहाराचे सोय देखील संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.. पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम ठरलेल्या वेळेत सुरू करण्यात येणार आहे, कारण ज्या ज्या मान्यवरांची निवड झाली आहे ज्यांना पुरस्कार मिळणार आहे हे वेगवेगळ्या ठिकाणहून मित्र मंडळीसह येणार आहेत म्हणून ठरलेल्या वेळेत कार्यक्रम सुरू होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी... असे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे.