हा तर युती सरकारचा १५० कोटीचा दोन तासात उडून जाणारा हवामहल! : आम आदमी पार्टी

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : 29 एप्रिल रोजी चोंडी येथे मंत्रिमंडळ बैठकीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दीडशे कोटी खर्च करून शामियाना,ग्रीन रूम्स स्टेज सह इतर सुविधा उभ्या केल्या जाणार आहेत. या सर्व सुविधा *तात्पुरत्या स्वरूपात परंतु भव्य दिव्य* असणार आहेत यामध्ये वातानुकूलन यंत्रणा जनरेटर सीसीटीव्ही आदी व्यवस्था तीन दिवसात उभ्या केल्या जाणार असून त्याचा वापर केवळ दोन-तीन तास होणार आहे. 

अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म गावी ही महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक होणार आहे *मध्यप्रदेश सरकारने ही अहिल्यादेवी जयंती निमित्त इंदूर येथे मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती त्याच धर्तीवर* चोंडीत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

केवळ प्रसिद्धीसाठी आणि दिखाऊ अस्मितांच्या सहाय्याने बहुजन समाजाची भलावण करण्यासाठी दीडशे कोटीचा खर्च केला जाणार आहे. हे *दीडशे कोटीचा दोन तासांमध्ये हवेमध्ये उडून जाणारा हवामहाल* उभा करण्यासाठी होणार आहे अशी टीका आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी केली आहे. 

राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली असून कंत्राटदार लाडकी बहीण शाळा एसटी कामगार, शिष्यवृत्तीचे विद्यार्थी, शाळा परिपूर्ती या सगळ्यांची राहिलेले आहे. असे असताना हा खर्च म्हणजे कर्ज काढून दिवाळी साजरी करण्याचा प्रकार आहे. 

तात्पुरत्या हवा महालावर एवढ्या मोठ्या प्रमाणावरील हा वायफळ खर्च सरकारने करू नये असे आवाहन आम आदमी पार्टीने केले आहे.                                                                           -- 

मुकुंद किर्दत , आप राज्य प्रवक्ता

Post a Comment

Previous Post Next Post