१५ गद्दार काश्मिरीची ओळख पटली दहशतवाद्यांना मदत केल्याचा संशय.

  पहलगाम हल्ल्याचे तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणे कडे            

 प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे :

 पुणे दि.काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवरती झालेल्या  भ्याड हल्यात २८ निष्पाप नागरिकांचे जीव दहशतवादी लोकांनी गोळ्या झाडल्या घेतले आता केंद्र सरकारने दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवला आहे. मागील आठवड्यात झालेल्या या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. दरम्यान, या हल्ल्यासंदर्भात रोज नवं नवे खुलासे होत आहेत. दरम्यान, पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांना काश्मिरी नागरिकांनी मदत केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी १५ स्थानिक काश्मिरी  कामगारांची ओळख पटली आहे. त्यांच्यावर पुरवठा व शस्त्रास्त्र पाठवण्याची जबाबदारी असल्याचा संशय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तपासात पाच मुख्य संशयितांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यापैकी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस उर्वरित दोन स्थानिकांचा शोध घेत आहेत. तसेच, तपासात असेही उघड झाले आहे की, हल्ल्याच्या दिवशी हे आरोपी संबंधित भागात उपस्थित होते. तसेच त्यांचा फोन देखील सक्रिय होता. इलेक्ट्ऱॉनिक सर्व्हिलन्समध्ये या आरोपींनी पाकिस्तानी दहशतवाद्यांशी संवाद साधल्याचे आढळून आले आहे.

  हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी केली रेकी? व्हिडीओ आला समोर..

सध्या १५ स्थानिक काश्मिरी ओव्हरग्राऊंड कामगारांची चौकशी सुरु असून पाच ओजीडब्ल्यू हल्ल्यात सक्रिय असल्याचे ठोस पुरावे मिळाले आहेत.  मागील काही वर्षात दक्षिण काश्मिरमध्ये झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना त्यांनी मदत केल्याचा संशय आहे. या दहशतवाद्या सहकाऱ्यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना साहित्य पुरवण्यात मदत केली. तसेच जंगलात माहिती दिली आणि हल्ल्यामध्ये वापरण्यासाठी पाकिस्तानकडून शस्त्र मिळवली. अशी माहितीदेखील हाती लागली आहे. 

हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी केली रेकी..?

पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामधील दहशतवाद्यांचा शोध तपास यंत्रणा आणि लष्कराकडून घेतला जात आहे. तब्बल २८ निरपराध नागरिकांचे बळी घेणाऱ्या या दहशतवाद्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला घडवला असून, त्यापूर्वी रेकी केल्याचेदेखील समोर आले आहे. या ‘थिअरी’ला पुष्टी देणारा एक व्हिडीओ समोर आला असून, देहूरोड येथे राहणाऱ्या पर्यटकाच्या मोबाईलमध्ये १८ एप्रिल रोजीच्या आपल्या कुटुंबासह पर्यटनाला गेले असता मुलीचे रिल्स बनवत असताना चित्रीकरणात दोन संशयित दहशतवादी चालताना बोलताना चित्रित झाले आहेत. 

घटनेच्या तीन दिवस आधीच्या या व्हिडीओमध्ये हे दोन संशयित पहलगामच्या येथील प्रसिद्ध असलेल्या मिनी स्वित्झर्लंडमध्ये फिरत असतानाचा हा व्हिडीओ आहे. संबंधित पर्यटकाने ही माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात, ‘एनआयए’ला दिली आहे.   देहूरोड येथे राहणाऱ्या आरटीआय कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांनी ही माहिती ‘ प्रेस मीडीया लाईव्ह या वृत्त वाहीनीला दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post