पुण्यातील मुस्लिम बॅंक आणि आझम कॅम्पसमध्ये गैरव्यवहाराचा आरोप. ---

 ३०,००० कोटी रुपये सह आझम कॅम्पस विद्यार्थ्यांच्या भवितव्य धोक्यात.:- संचालक अँड.आयुब शेख .

प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे :

 पुणे . :- पुण्यातील मुस्लिम बॅंक आणि आझम कॅम्पसमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आलेचे आझम कॅम्पसचे माजी सचिव मुस्लिम बॅंकेचे संचालक आयुब शेख यांनी खळबळजनक माहिती दिली यामुळे तीस हजार कोटी रुपये धोक्यात आलेचे तसेच अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे भवितव्य ही धोक्यात आलेचे आरोप करण्यात आले आहे

 सविस्तर माहिती अशी कि पुण्यातील नामांकित अशी मुस्लिम बँक आणि आझम कॅम्पस या दोन्ही संस्था अनेक वर्षांपासून एकाच कुटुंबाच्या ताब्यात असून, यामध्ये अनेक गैरव्यवहार आणि अनियमितता दिसून येत आहे. आर्थिक अनियमितता, खासगीकरण व गैरव्यवहाराच्या माध्यमातून संस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यामुळे यावर तत्काळ कारवाई होण्यासाठी शासनाने सखोल चौकशी करावी. त्याचबरोबर या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली असल्याची माहिती आझम कॅम्पस संस्थेचे माजी सचिव आणि मुस्लिम बँकेचे संचालक अयुब शेख यांनी पुणे पत्रकार परिषदेत माहीती देताना दिली.


दरम्यान, या पत्रकार परिषदेला या वेळी माजी नगरसेवक उस्मान हिरोली, अ‍ॅड. अन्वर हुसेन आणि बँकिंग तज्ज्ञ अबरार खान उपस्थित होते. या वेळी शेख म्हणाले, या दाखल करण्यात आलेल्या याचिकेत आझम कॅम्पस आणि बँक १०० टक्के सुरक्षित आहे जोपर्यंत नियामक प्राधिकरण संविधानिक मूल्यांसह मजबूत आहे. परंतु एकाच कुटुंबाच्या फायद्यासाठी त्याचे खासगीकरण व स्मॉल बँकेत रूपांतर करण्याचे षड्यंत्र होऊ नये यासाठी सखोल चौकशीची मागणी केलेली आहे.

अ‍ॅड. अन्वर हुसेन म्हणाले, सध्याचे प्रशासकीय, व्यवस्थापन मंडळ एकाच इनामदार कुटुंबाच्या नियंत्रणाखाली आहे आणि ट्रस्ट आणि सोसायटीची ३०,००० कोटींची मालमत्ता धोक्यात आहे. मुख्य कर्मचारी देखील इनामदार कुटुंबाचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नातेवाईक आहेत.

सध्याचे गव्हर्निंग बोर्ड विसर्जित केले जावे आणि स्वतंत्र संस्था, प्रशासक किंवा प्राप्तकर्ता नियुक्त केला जावा. कारण इनामदार, त्याचे कुटुंब आणि साथीदार यांच्याकडून मालमत्तेचे हस्तांतरण होण्याची जास्त शक्यता असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

अँड अयुब शेख म्हणाले, इनामदार कुटुंबाने त्यांचा व्यवसाय कॅनडा आणि एडिनबर्ग (स्कॉटलंड) मध्ये स्थापित केला आहे आणि परदेशात त्यांची ओळखपत्रे दाखवून समुदाय मालमत्ता आणि सदिच्छा वापरल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयासमोर रिट याचिका ही दाखल केली आहे.

इनामदारांनी खासगी विद्यापीठाचा स्वतःचा ब्रँड स्थापन करून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे शासनाने यासंदर्भात तातडीने चौकशी करावी, अशी मागणी ही आयुब शेख यांनी या वेळी केली.

Post a Comment

Previous Post Next Post