रिपाई (सचिन खरात गट )या पक्षाच्या वतीने खडकी चेतन दत्ता गायकवाड शाळेला निवेदन...शिक्षण महत्वाचे नाही शाळांना पैसा महत्वाचा जाहीर निषेध.. फिरोज मुल्ला (सर ).




प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे (खडकी ).. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट )मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य फिरोज मुल्ला (सर )यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या मुख्यध्यापिका मा. नायर मॅडम यांना इयत्ता सहावीत शिकत असणाऱ्या कु. वंश रुपेश मोहिते  या विध्यार्थ्यांने फी न भरल्यामुळे वार्षीक परीक्षेला बसू दिले नाही त्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले

चेतन दत्ता गायकवाड या इंग्रजी माध्यम शाळेने शिक्षण हक्क कायद्या पायदळी तुडवत वंश रुपेश मोहिते या विध्यार्थ्यांने फी न भरल्यामुळे वार्षिक परीक्षेला बसू दिले नाही वंशचे पालक रुपेश मोहिते यांचे मेडिकल प्रॉब्लेम झाले होते तरी त्यांनी आतापर्यंत थोडे थोडे करत फिचे पैसे भरत आले आहेत तरीपण पूर्ण पैसे भरल्याशिवाय आम्ही वंशला वार्षिक परीक्षेला बसू देणार नाही असे शाळेने ठणकाहून सांगितले त्यांनी रिपाई (सचिन खरात गट )या पक्षाकडे तक्रार केली सांगतले की माझ्या मुलाला न्याय मिळून द्या म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिकेला जाब विचारण्यात आला तेंव्हा मॅनेजमेंटच्या तोंडातून फक्त पैसाची बोलणीच येत होती शिक्षणा संदर्भात ऐक चकार शब्द बोलत नव्हते यावर चर्चा करत असताना फिरोज मुल्ला सर यांनी शाळा मॅनेजमेंटला शिक्षण हक्क कायद्याची आठवण करून दिली तुम्ही त्याची पायमल्ली करत आहात संविधानिक शिक्षण हक्क कायदा काय सांगतो खासगी शाळा असो किंव्हा सरकारी शाळा असो विध्यार्थ्यांला शिक्षणापासून व परीक्षापासून वंचीत ठेवण्याचा अधिकार नाही आणि तुम्ही फक्त पैसामुळे त्या विध्यार्थ्यांचा हक्क हिरावून घेत असाल तर तुम्ही नुसता शाळेच्या नावावर धंदा करत आहात हे निंदनीय आहे आणि आम्ही कुठल्याच विध्यार्थ्यां बरोबर हे होऊ देणार नाही संविधान आपल्या सर्वांना शिक्षणाचा अधिकार देत आहे . 

केंद्र सरकार राज्य सरकार 100%शिक्षण देण्याचा दावा करत आहे आणि या शाळेत असी घटना घडत असेल तर निषेधार्थ आहे वंश मोहिते या विध्यार्ध्याची पुन्हा परीक्षा घेऊन त्याचे शैक्षणिक झालेले नुकसान शाळेने पुन्हा भरून काढले पाहिजे नाहीतर आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण अधिकारी यांना रीतसर शाळेची तक्रार करू असे शिष्ट मंडळाच्या वतीने निवेदन देताना इशारा देण्यात आला यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज ट्रस्टचे अध्यक्ष तुषार मोहिते, युवा नेते संदीपभाऊ शेंडगे, दशरत परदेशी,अंकुश साठे, प्रवीण चव्हाण, रुपेश मोहिते, सौ. नीलम मोहिते,आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post