ख्रिस्ती धर्म गुरु पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी व्हॅटिकन सिटी येथे निधन.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दुःख प्रकट भारतात तीन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर .  


प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे :

 पुणे दि. :- गेल्या काही दिवसांपासून आजारपणाशी झुंजत असलेले ख्रिस्ती धर्म गुरु पोप फ्रान्सिस यांचे आज सकाळी ७:३५ मिनिटांनी व्हॅटिकन सिटी येथे निधन झाल्याची  व्हॅटिकनकडून देण्यात आली आहे. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य रोम येथील चर्चच्या सेवेसाठी वेचले.  पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला आयुष्यातली मूल्ये शिकवली. तसेच, धैर्य आणि प्रेम यांचा संदेश दिला, असे म्हणत व्हॅटिकनने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. व्हॅटिकनकडून एक व्हिडीओ संदेश देण्यात आला. त्या संदेशात पोप फ्रान्सिस यांच्या निधनाचे वृत्त देण्यात आले आहे.


रोमन कॅथलिक चर्चचे पहिले लॅटिन अमेरिकन पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले. त्यांना फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. फेब्रुवारी महिन्यात रोम येथील जेमेली रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यावेळी त्यांची प्रकृती आधी ढासळली होती. पण, नंतर हळूहळू त्यांची प्रकृती सुधारली आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सोमवारी (दि. २१) सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पोप फ्रान्सिस यांची प्राणज्योत मालवली. पोप फ्रान्सिस यांचे जन्मांचे नाव खोर्खे मारिया बेर्गोल्यो असे असुन त्याचा जन्म १७ डिसेंबर १९३६ साली ब्यूनस आयर्स अर्जेंटिना येथे झाले 


२०१३ मध्ये पोपपदी निवड


कार्डिनल जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ यांची २०१३ मध्ये बेनेडिक्ट सोळावे यांचे उत्तराधिकारी म्हणून निवड झाली होती. त्यांना पोप फ्रान्सिस म्हटले जाते. पोपपदी येणारे युरोपबाहेरचे ते पहिले पोप ठरले होते. २६६ वे पोप म्हणून त्यांची निवड झाली त्यावेळी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. रोमन कॅथलिक चर्चचे नेतृत्व करताना १२ वर्षांच्या काळात पोप फ्रान्सिस यांना अनेकवेळा रुग्णालयात दाखल व्हावे लागले. तसेच अनेक वैद्यकीय समस्यांचा सामनाही करावा लागला.


वयाच्या २१ व्या वर्षी त्यांचे एक फुफ्फुस काढावे लागले होते.  मार्च २०२३ मध्ये त्यांना ब्राँकायटिसमुळेच तीन दिवस रुग्णालयात दाखल राहावे लागले होते. त्यानंतर जून महिन्यात त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रियाही करण्यात आली. आणखी एका आजारपणामुळे त्यांना २०२३ मध्ये यूएईमध्ये झालेल्या हवामान परिषदेलाही उपस्थित राहता आले नव्हते.  आतापर्यंतचे सर्व पोप हे व्हॅटिकन सिटीतील पेंट हाऊस अपार्टमेंट वापरत असत. परंतु, पोप फ्रान्सिस यांनी ते पेंट हाऊस नाकारले आणि स्वतःसाठी गेस्ट हाऊसमधील छोटे घर निवडले होते. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचीही चर्चा झाली होती. पोप फ्रान्सिस यांनी जागतिक अर्थव्यवस्थेत परवलीचा शब्द असलेल्या मुक्त-बाजार या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चर्चने समलिंगी लोकांबद्दल मत बनवण्यापेक्षा त्यांची माफी मागितली पाहिजे, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या भूमिकांमुळेही ते चर्चेत राहिले.                     भारतात तीन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर. तर अनेक राष्ट्रे दुखवटा जाहीर करत आपले झेंडे तीन दिवस अर्धे खाली ठेवणार.                     "भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले दुख" म्हणाले "लहान वयापासूनच त्यांनी येशू ख्रिस्तांच्या आदर्शांप्रती स्वतःला समर्पित केले होते. त्यांनी गरीब आणि वंचित लोकांची तत्परतेनं सेवा केली. दुःखी लोकांना आशा देण्याचं काम त्यांनी केलं," असं मोदी म्हणाले.


"भारतातील लोकांविषयी असलेलं त्यांचं प्रेम नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो," असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post