प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे: काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांनाकाल शुक्रवारी ( २५) रात्री आठ वाजता कॅडल मार्च काढून धायरी ग्रामथ्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली शेकडो महिला, युवकांसह जेष्ठ नागरिक रस्त्यावर उतरले होते.
यावेळी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला धायरी गावातील शिवकालीन श्री काळभैरव मंदिरापासुन सिंहगड रस्त्यावरील धायरी येथील उंबऱ्या गणपती चौका पर्यंत नागरिकांच्या श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रांगा लागल्या होत्या. धायरी ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, भारताचे वैभव असणाऱ्या सौंदर्य असणाऱ्या *काश्मीर* येथे आवडीने पर्यटक जातात. सुरक्षा यंत्रणांच्या हालगर्जीपणामुळे निष्पाप पर्यटकांचे बळी गेले. भारत सरकारने पाकिस्तानला अद्दल घडवावी
याप्रसंगी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले, अतिरेक्यांच्या विरोधात शासनाने कठोर पावले उचलली पाहिजेत.अंधाधुंद गोळीबार, बाॅम्ब स्फोट करणाऱ्या अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करावी.
अँड .राजेश मिडे म्हणाले, पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी कारवाया अनेक वर्षांपासून सुरू आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान अशी लढाई आहे. मुसलमान विरुद्ध हिंदू अशी लढाई नाही. पहलगाम येथे एका मुस्लिम युवकाने स्वतः चे प्राण देऊन हिंदू पर्यटकांचे रक्षण केले.
यावेळी किशोर पोकळे, मिलिंद पोकळे निलेश दमिष्टे ,सनी रायकर, विजय लायगुडे, तुषार पोकळे, गंगाधर बडावळे ,जयश्री पोकळे स्वाती पोकळे ,सुरेश गायकवाड, पांडुरंग रायकर, महेंद्र भोसले, सुनील भोसले ,दीपक चव्हाण, बाबा जोरे ,संजय पोकळे आदी उपस्थित होते