प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
पुणे दि. :- पहेलगामच्या अतिरेकी हल्ल्याने संपूर्ण जग हा हादरून गेले याबाबत देशात अनेक ठिकाणी पाकिस्तानच्या विरोधात तसेच दहशतवाच्या निषेधार्थ मोर्चा ठिकठिकाणी जाहीर निषेध सुरू असताना देहूरोड येथील श्रीजीत रमेशन हे आपल्या परिवारासह बेसरण व्हॅली येथे पर्यटन साठी १८ रोजी बेसरण व्हॅली येथे आपल्या पत्नी व सहा वर्षे मुलीसह पर्यटनाला गेले होते पहलगाम येथून पाच ते साडेपाच किलोमीटर अंतर असलेल्या बेसरण व्हॅली या ठिकाणी श्रीजीत रमेशन हे आपल्या चिमुकुलेचे नृत्य करतानाचे रिल्स बनवत असताना या हल्ल्यातील दोन संशयित अतिरेकी त्यांच्या मोबाईल मध्ये कैद झाले होते ,
बेसरण व्हॅली येथून २१ रोजी कुटुंबासह गुलमर्ग आणि श्रीनगर येथे गेले कश्मीरहुन परत आल्या नंतर दुसऱ्याच दिवशी पहलगाम मध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली यात २८ निष्पाप लोकांचे जीव गेले ही बातमी प्रसार माध्यमातून झळकत असताना श्रीजीत रमेशन यांच्या लक्षात आले की आपण बेसरण व्हॅली या ठिकाणी आपण फिरण्यास गेलो होतो आणि तिथे आपल्या मुलीचे रिल्स बनवीत होतो प्रसार माध्यमावर ज्या अतिरिक्यांचे फोटो प्रसिद्ध होत आहेत त्यातले दोन संशयित अतिरिकी आपल्या मोबाईल मध्ये कैद झाल्याचे संशय आले त्यांनी ही घटना आपल्या पत्नीला सांगितले आणी काढलेल्या फोटो रिल्स मोबाईल मध्ये प्रसारमाध्यमां वरती दिसत असलेल्या संशयित अतिरेकी मोबाईल मध्ये खुलेआम फिरताना दिसले याबाबत श्रीजीत रमेशन यांनी राष्ट्रीय तपास संस्थेशी संपर्क करून ते वीडियो मधील संशयित अतिरिकी असल्याचे माहीती (एनआयए) यांना कळविले. हल्ल्याच्या बाबत श्रीजीत रमेशन यांना प्रसार माध्यमावर पत्रकारांनी विचारले असता रमेशन म्हणाले आम्ही जेथे फिरायला गेलो होतो तेथे खूपच पाऊस पडल्याने चालणे मुश्किल झाले होते अनेक पर्यटक हे घोडे किंवा खच्चर यावर बसून फिरत होते आम्ही ही घोडेवर बसुन फिरत होते बेसरण व्हॅली येथून पहलगाम येथे आम्ही गेलो नाही, हे आमचे नशीब पण तेथे कुठली सुरक्षा नव्हते लष्करी जवान किंवा पोलीस यांच्या कुठेही बंदोबस्त दिसत नव्हते, हे खूप दुःखाची बाब आहे जर तेथे सुरक्षायंत्रणा असती तर ही घटना घडली नसती अशी खंत त्यांनी माध्यमातून व्यक्त केले. याचा अर्थ असा आहे की पहलगाम येथे अतिरेकी हल्ला करण्याचा डाव पहिले पासून हे अतिरेकी आकत होते आणि रेकी करत होते हे अतिरेकी खुलेआम बेसरण व्हॅली येथे फिरताना दिसत होते पहलगाम परिसर हे फक्त बेसरण व्हॅली पासुन अवधे पाच ते साडेपाच किलोमीटर अंतरावर आहे, देवाची कृपा आहे आम्ही पहलगाम येथे गेलो नाही असे ही श्रीजीत रमेशन यांनी सांगितले.