काश्मिरमध्ये पहलगाम येथे दहशदवाद्याच्या भ्याड हल्याचा जाहीर निषेध.. रिपाई (सचिन खरात गट )

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : पाकिस्तानी दहशतवाद्यांनी  जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम येथील भारतीय पर्यटकांवरती केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध पाकिस्तानचा झेंडा जाळून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात पुणे शहर यांच्या वतीने करण्यात आला .

 पाकिस्तान मधील हे दहशतवादी दोन आठवड्यापूर्वीच काश्मीर मध्ये आले होते असे आता तपासात सांगण्यात येत आहे दोन आठवडे अतिरेकी काश्मीरमध्ये ठळ ठोकून असताना आपली भारतीय गुप्तचर यंत्रणा,संरक्षण यंत्रणा यांना थोडासुद्धा सुगावा लागला नाही का या निष्पाप पर्यटकांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारून देशाचे गृहमंत्री मा. अमित भाई शहा यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कांबळे यांनी केली भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र भाई मोदी सारखे सांगत असतात देश सुरक्षित हातात आहे असे असताना या घटनेला कोण जबाबदार माननीय नरेंद्र भाईंनी सुद्धा राजीनामा द्यावा अशा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात यांची मागणी आहे 

 बळी गेलेल्या सर्व भारतीय नागरिक पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली 

 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पुणे शहर अध्यक्ष राजाभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध मोर्चा झाला यावेळी पक्षाचे महाराष्ट्र संघटक फिरोज मुल्ला, युवक अध्यक्ष राहुल घोडके, युवक जिल्हाध्यक्ष सनी मुळे, उपाध्यक्ष अशोक पवार, संघटक जय प्यागे, हकीक खान सामाजिक कार्यकर्ते सुनील मामा कांबळे  त्याचबरोबर महिला उपाध्यक्ष संतोषी डोळसे, शहर संघटिका सौ रेखाताई कांबळे, मीराताई वाघमारे, वृंदावनी देशमुख, निधी घाणेकर इत्यादी महिला आघाडीचे कार्यकर्ता ही उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post