पुणे : कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी १ असे निरीक्षक नेमले आहेत. या निरीक्षकांवर जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.दरम्यान, प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी हुकलेल्या सतेज पाटलांवर आता पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.दरम्यान, प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी हुकलेल्या सतेज पाटलांवर आता पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
काँग्रेसला महाराष्ट्रात लोकसभेला चांगलेच यश मिळाले पण विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहिले अन् प्रदेशाध्यपदासाठी काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटीलांचे नाव आघाडीवर होते. मात्र, हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली.
नव्याने संघटन उभारणी करणे काँग्रेसच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असून या संघटनात्मक गोष्टींचा आढावा घेण्याची जबाबदारी बंटी पाटलांवर पुण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या निरीक्षकांवर सोपविण्यात आलेल्या जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्याची जबाबदारी त्याच्यावर असणार आहे. त्यानुसार सपकाळ यांनी प्रत्येक जिल्ह्याकरीता पक्ष संघटनेतील एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.
एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या पुणे जिल्ह्यात सध्या काँग्रेसचा एकही लोकनियुक्त प्रतिनिधी पाहायला मिळत नाही. निवडणुकीपूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे ३ आमदार होते. मात्र या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातून काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे. पक्षाची हीच विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच कोल्हापूरच्या सतेज पाटलांना पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काही दिवसांत बंटी पाटील हे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची काँग्रेस नेत्यांशी चर्चा करून सद्याच्या परिस्थितीचा अहवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना पाठवतील.