लोकप्रतिनिधी नसल्याने केवळ प्रशासना मार्फत रुग्णालयाचा गाडा हाकला जात असल्याचे चित्र दिसत आहे
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
पिंपरी :- पिंपरी चिंचवड वासियांसाठी वरदान असलेले वायसीएम रुग्णालय सध्या रामभरोसे असल्याचे दिसत आहे लोकप्रतिनिधी नसल्याने केवळ प्रशासना मार्फत रुग्णालयाचा गाडा हाकला जात असल्याचे चित्र दिसत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे सुविख्यात आहे अनेक रुग्ण येथे उपचार घेण्यासाठी फार लांबून येत असतात आज दिनांक १७ रोजी सकाळी सकाळी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात इंटरनेट सेवा खंडीत झाल्यानें उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे हाल झाले इंटरनेट सेवा बंद पडल्याने लांबच लांब रांगा लागल्या त्यामुळे अनेक रुग्णांना व नातेवाईकांचे हाल झाले व नाहक त्रास सहन करावा लागला. रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या करीता ओपीडीत उपचारासाठी नोंदणी करणे गरजेचे असते. इंटरनेट सेवा बंद पडल्यामुळे ऍडमिशन अभावी रुग्णांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या प्रशासनाने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून संबंधितांवर कडक कारवाई करावी. पुन्हा अशाप्रकारे इंटरनेट सेवा ठप्प पडणार नाही याकरिता योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.
----------------------------------------