आंबेडकर चळवळीतील युवा कार्यकर्ते मनोज अशोक ताटे यांच्या शोकाकुल वातावरणात अंत्य संस्कार.

अनेक मान्यवरांची उपस्थितीत अंतिम संस्कार युवा कार्यकर्ते हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

 पिंपरी दि. :- आंबेडकर चळवळीतील युवा कार्यकर्ते मनोज अशोक ताटे यांचा रेल्वेच्या धडकेने ९ अप्रैल रोजी रेल्वे लाईन ओलांडताना अपघाती निधन झाले.  ब्राह्मणवाडी वडगाव मावळ येथील व्ही के पोल्ट्री फार्म येथे कामाला  जात असताना पहाटेच्या वेळी रेल्वे लाईन ओलांडताना भरधाव वेगाने येत असलेल्या एक्स्प्रेस गाडीने धडकल्याने त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाले ही बातमी कळताच सर्वत्र शोकाकुल पसरले  मनोज ताटे हे आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते असल्याने तसेच मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांचा जनसंपर्क ही मोठ्या प्रमाणात होत निधनाची बातमी कळताच अनेक लोक भिमशक्ती चौक येथील पंचशील बुद्ध विहारात येथे आले त्यांचा पार्थिव शरीर निगडी येथील पंचशील बुद्ध विहारात ठेवण्यात आले होते तेथे त्यांचे अनेक नातेवाईक व मित्र मंडळीने अंतिम दर्शन घेतले सायंकाळी पाच च्या दरम्यान शोकाकुल वातावरणात दिवंगत मनोज ताटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले .

 यावेळी आलेल्या अनेक मान्यवरांनी भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली मनोज ताटे यांच्या मागे पत्नी ,तीन मुली आहेत एक मुलगी इयत्ता ६वी तर एक मुलगी इयत्ता ८वी मध्ये शिकत आहे तर एक छोटीशी चिमकुली ते अडीच वर्षाची आहे तर विशाल आणि संतोष असे दोन भाऊ असा त्यांचा मागे परिवार आहे. मनोज अशोक ताटे हे द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व टी व्ही के नाईन या वृत्त वाहीनी चे संपादक डॉ रामदास ताटे यांचे ते पुतणे होत.

Post a Comment

Previous Post Next Post