प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचालित कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड. पेठ वडगाव येथे दिं. 7 एप्रिल 2025 रोजी बी.एड. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ घेण्यात आला. महाविद्यालयाच्या परंपरेनुसार या कार्यक्रमासाठी बी.एड. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी संपूर्णपणे तयारी केली होती. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थीनी सौ प्रार्थना पाटील- पवार (संचालिका मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी कोल्हापूर) व सौ वृशाली नामे(प्राचार्य आदित्य विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेज पणोरे) लाभल्या. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थाध्यक्ष मा. विजयसिंह माने साहेब संचालक के. डी. सी. सी. कोल्हापूर महाविद्यालयामध्ये उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आर. एल. निर्मळे मॅडम होत्या. कार्यक्रमाची सुरुवात अतिथींचे स्वागत, प्रतिमापूजन, दीप प्रज्वलन, व वृक्षास जलार्पण अशा स्वरूपात झाली.*बी.एड. द्वितीय वर्ष निरोप समारंभ व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा* असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. कार्यक्रमांमध्ये प्रास्ताविक, पाहुण्यांचे ओळख व स्वागत त्यानंतर प्रथम व द्वितीय वर्षातील छात्राध्यापकांची मनोगते झाली. द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यी मनोगताच्या दरम्यान खूपच भावनाविवश झाले होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये प्रथम व थर्ड सेम मध्ये गुणांकन प्राप्त विद्यार्थी व वर्षभरातील विविध स्पर्धांमध्ये गुणांकन प्राप्त विद्यार्थी या सर्वांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये प्रशस्तीपत्र देऊन सर्वांना गौरविण्यात आले. त्यानंतर द्वितीय वर्षाच्या वर्गशिक्षिका प्रा. शिरतोडे व्ही.एल. यांनी आपले मनोगत व्यक्त केले व त्यानंतर अतिथींचे अनमोल असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले. दोन्ही माजी विद्यार्थिनी अतिथी म्हणून त्यांनी आत्ताच्या बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मोलाचे आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून विशेष असे मार्गदर्शन केले. त्यानंतर अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्या डॉ .निर्मळे आर. एल. मॅडम यांनी विद्यार्थ्यांना भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आयुष्यामध्ये जगण्यासाठी व शिक्षक म्हणून जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी अनमोल असे मार्गदर्शन केले. त्यानंतर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी फनी गेम्सचे आयोजन केले होते. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना अल्पोपहार व भेटवस्तू देण्यात आली. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ही महाविद्यालयाला भेटवस्तू प्रदान केली. संस्था अध्यक्ष मा. विजयसिंह माने साहेब यांनी माजी विद्यार्थी अशा दोन्ही अतिथींचे कौतुक केले व कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवून अनमोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी अभिजीत सावंत व प्रगती चौगुले या प्रथम वर्षाच्या छात्राध्यापकांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक सुषमा देसाई व आभार प्रणिता पाटील यांनी मानले. तसेच प्रथम वर्षाच्या सर्वच विद्यार्थ्यांनी आपल्या एकजुटीने व सहकार्याने सर्व जबाबदाऱ्या पार पाडून कार्यक्रम संपन्न केला.या कार्यक्रमास प्रा. शिरतोडे व्ही.एल., प्रा. डॉ.पवार ए. आर. , प्रा.सोरटे.एस.के.,प्रा. सावंत ए.पी., चौगुले एस.एस.तसेच प्रथम व द्वितीय वर्षाचे छात्राध्यापक, छात्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.