जातीयवादी सेन्सोर बोर्ड बरकास्त करा.. फिरोज मुल्ला (सर ) मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई...लोकांचा सिनेमा चळवळ आणि पक्ष संघटनाच्या वतीने बहुजनांची अभिव्यक्ती आणि संस्कृती व "चल हल्ला बोल" या चित्रपटला नाकारणाऱ्या सेन्सोर बोर्डा विरोधात राज्यस्तरीय परिषद घेण्यात आली प्रमुख मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार निरंजन टकले होते दिग्दर्शक लेखक निर्माते महेश बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आली होती .
या परिषदेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट )या पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्य संघटक फिरोज मुल्ला (सर )यांनी परिषदमध्ये सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला या कार्यक्रमाचे आयोजन रवी भिलाने यांनी केले सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले या परिषदेला राज्यभरातून लोकांनी सहभाग घेतला
फिरोज मुल्ला (सर )त्यांच्या मनोगतात म्हणाले मला जेंव्हा कळले की "चल हल्ला बोल "ह्या चित्रपटला सेन्सोर बोर्डाने नकार दिला तेंव्हा मी चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांना फोन करून बोललो आणि पुण्यामध्ये महाराष्ट्रा मधून पहिली पत्रकार परिषद घेऊन बोर्डा विरोधात जाहीर निषेध करून आवाज उचलला त्यानंतर चळवळीतील नेते व कार्यकर्ते सक्रिय सहभागी झालेत्यांनी महाराष्ट्रभर आंदोलन केली आणि आज मुंबई येथे राज्यस्तरीय परिषद आयोजित झाली असच ऐक होऊन बोर्डाविरोधात क्रांतिकारी चळवळ उभी करणे काळाची गरज आहे हा चित्रपट पदमश्री पँथर नामदेव ढसाळ यांच्या कवितेवर व दलित सोषित पीडितावर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर आधारित दिग्दर्शक लेखक महेश बनसोडे निर्मित चित्रपट आहे प्रसिद्धीची परवानगी घेण्यासाठी गेले असता नामदेव ढसाळची कविता आणि काही दृश्य कट करण्यास सेन्सोर बोर्डाने सांगतले दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी नकार दिला बोर्डाने परवानगी नाकारली आणि कोन नामदेव ढसाळ असे सेन्सोर बोर्डाने सांगतले हा पँथर नामदेव ढसालांचा अपमान आहे सेन्सोर बोर्डाच्या कमरड्यात लात घालून सांगावस वाटतं तुझा बाप नामदेव ढसाळ ज्या नामदेव ढसाळाच्या साहित्यामुळे इथल्या जातीयवादी वेवस्थेच्या चिंधड्या उडवल्या त्याचे जागतिक स्थरावर साहित्य प्रसिद्ध झाले भारत सरकारने पदमश्री पुरस्काराने सन्मानित केले तरी यांना ढसाळ माहित नाही हे या सेन्सोर बोर्डाचे दुर्दैव म्हणावं लागेल सध्याच्या परिस्थितीत जात उफाळून बाहेर येत आहे रस्त्यावर जात दिसते गल्लीत जात दिसते सोसायटी मध्ये जात दिसते शाळेत जात दिसते आणि चित्रपट क्षेत्रात सुद्धा कुठल्या जातीचा दिग्दर्शक निर्माता आणि त्याने त्याचा चित्रपटात सरकार विरोधी किंव्हा दलित मुस्लिम अल्पसंख्यांक सोषित पीडित यांच्यावरील वास्तव चित्रित केले की ते बघून सेन्सोर बोर्ड एका सेकंदात चित्रपटला नकार देत आहे आणि धन दांडगे दिग्दर्शक निर्माते यांच्या चित्रपटात मात्र कसलेही अवमानकारक दृश्य असो ते लगेच पास केले जातात या सेन्सोर बोर्डाला बरकास्त करण्यासाठी ही चळवळ उभी केली पाहिजे असे मत फिरोज मुल्ला सर यांनी मांडले