प्रेस मीडिया लाईव्ह :
ज्येष्ट अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालं. त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मनोज कुमार यांना त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी आणि 'भारत कुमार' या नावाने विशेष ओळख मिळाली होती.२४ जुलै १९३७ रोजी मनोज कुमार यांचा जन्म झाला होता. त्यांचं खरं नावं हरिकृष्ण गिरी गोस्वामी असून ते सर्व कलाकारांसाठी प्रेरणास्थान होते. मनोज कुमार यांनी केवळ अभिनयच केला नाही तर "शहीद" (1965), "उपकार" (1967), "पूरब और पश्चिम" (1970) आणि "रोटी कपडा और मकान" (1974) अशा अनेक देशभक्तीपर चित्रपटांचे दिग्दर्शनही केलंय.
पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित
भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल मनोज कुमार यांना १९९२ मध्ये पद्मश्री आणि २०१५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने लाखो लोकांची मनं जिंकली. देशभक्तीपर चित्रपटांव्यतिरिक्त, त्यांनी "हरियाली और रास्ता", "वो कौन थी", "हिमालय की गॉड में", "दो बदन", "पत्थर के सनम", "नील कमल" आणि "क्रांती" सारख्या अनेक सिनेमांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन केलंय.