पाच मे पासून नगरपरिषद कार्यालय समोर बेमुदत उपोषणाचा मनसेच्या वतीने इशारा .
-
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
मावळ दि. :- तळेगाव मधील नागरी समस्या बिकट होत चालली आहे ठोस उपाययोजना न केल्यास व कामात सुधारणा न झाल्यास विभाग प्रमुखांना मनसे स्टाईल ने धडा शिकवले जाईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आले आहे विविध समस्या पुर्ती न झाल्यास पाच मे पासून नगरपरिषद कार्यालय समोर बेमुदत उपोषणाचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसेचे तालुकाध्यक्ष अशोक कुटे यांनी दिला आहे
याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना दिली. पत्रकार परिषदेत अरुण माने यांनी या उपोषणाला जाहीर पाठींबा दिला आहे या पत्रकार परिषदेत महादेव खरटमल फुले, शाहू, जयंत कदम माजी नगरसेवक अरूण माने सह मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन भांडवलकर यांनी ही शहरातील मुलभूत सुविधा इतर समस्या बाबत अनेक वेळा निवेदन देऊन ही कुठलेच काम होताना दिसत नाही उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणी टंचाई चे समस्या बिकट होत चालली आहे तसेच शहरातील कचरा वेळेवर उचलले जात नसल्याने दुर्गंधी पसरून रोग राईचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच तळेगाव मधील अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहेत नागरिकांना खड्डे चुकवत ये जा करीत आहेत अशी खंत पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब जांभुळकर,मावळ तालुका उपाध्यक्ष मोझेस दास,सागर भोसले, सुनिल साळवी, किशोर कवडे, महेंद्र साळवी,निरंजन चव्हाण, मिलिंद देशपांडे अरुण पाटील आदि उपस्थित होते.