तिरुपती बालाजीच्या धरतीवर,बिरोबा देवस्थानाचा विकास करावा.-----------प्रवक्ते संतोष पाटील

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

समस्त धनगर समाजाचे आराध्य दैवत बिरोबा देवस्थानाचा विकास तिरुपती बालाजीच्या धरतीवर करावा असे वक्तव्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी आरेवाडीत जाऊन बिरोबा देवस्थानाच्या आजूबाजूची पाहणी करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढे प्रवक्ते मा.संतोष पाटील म्हणाले की मी आज बिरोबा देवस्थान या ठिकाणी दर्शनासाठी आलो आहे.या भागाचा व इतर परिसराची पाहणी केली त्या वेळेला त्या ठिकाणी होणारी गैरसोय बद्दल प्रसार माध्यमांना माहिती दिली.

 महाराष्ट्रातील व देशातील समस्त धनगर समाज व बहुजन समाजाचे आराध्य दैवत असलेले आरेवाडीचे बिरोबा देवस्थानाचा ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यात्रा भरली होती. या वेळेला अंदाजे वीस लाखाहून अधिक भाविक या ठिकाणी येत असतात,परंतु या देवस्थानच्या परिसरातच पुरुष,महिला, लहान मुले,उघड्यावरच शौचास बसतात त्यामुळे या भागात व देवस्थानच्या परिसरातच दुर्गंधी पसरलेले असते. त्यामुळे अनेक रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुसज्ज शौचालय नसल्यामुळे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत असल्यामुळे या ठिकाणच्या असणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात भाविक बोटे मोडतात व त्यांना शिव्या घालतात त्यामुळे येणारे भाविक निराश होऊन जातात, कारण या ठिकाणी अनेक बकऱ्याच्या मटणाच्या जेवणाचा बेत केलेला असतो.त्याच ठिकाणी आपल्या कुटुंबासह पै पाहुणे, मित्रमंडळी व नातेगोतेतील सर्व मित्रमंडळींना त्या ठिकाणी जेवणासाठी बोलावलेलं असते, त्या ठिकाणी प्रचंड वार सुटलेला असल्यामुळे चुलीतीलआग दुसरीकडे लागू शकते,जमिनीवर जेवायला बसल्यामुळे खूप धुरळा जेवताना ताटात जातो,पाण्याची व्यवस्था नसते, मोठा पाऊस आला तर त्या ठिकाणी खूपच गैरसोय होते,काही प्रशासकीय शासकीय आणि येथील असणाऱ्या सामाजिक संस्था पदाधिकारी व काही पक्षाच्या नेत्यांना सांगू इच्छितो की या भागाचं कायापालट करायचा असेल तर सर्वांनी एकत्र येऊन या समस्येचा आवाज उठवला पाहिजे शासकीय, प्रशासकीय,जिल्हास्तरीय, व राज्य लेवलला निवेदन देऊन ह्या विषयी समस्या मांडून येथील परिसराचा बदल केला पाहिजे, हे ठिकाण तिरुपती बालाजी मंदिरच्या धरतीवर  सुसज्ज व दुर्गंधीमुक्त सुंदर शौचालय बांधणे आवश्यक आहे. येणाऱ्या भाविकांनी त्याचा वापर करून त्या ठिकाणी होत असलेली दुर्गंधी व कचरा पासून मुक्ती मिळेल व आरोग्यास धोका निर्माण होणार नाही व परिसर ही स्वच्छ राहील. तसेच भाविकांच मन प्रसन्न होईल अशाच पद्धतीचे पुढील काळामध्ये या ठिकाणी बदल करणे आवश्यक आहे. भविष्यकाळात आम्ही या देवस्थानाला सुख,सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सांगलीच्या जिल्हाधिकारी, पालकमंत्री , तालुक्याचे तहसीलदार प्रांत यांना भेटून या ठिकाणी आवश्यक ते बदल करण्याचे निवेदन देणार आहोत, या वेळेला प्रा.नंदकुमार सुर्वे,अरविंद ठोंबरे, सर्जेराव पाटील, एन एस केंगार,तानाजी कोकरे,धुळाप्पा कोकरे, काशिनाथ आलदर,सतीश शिकलगार,सुरेश आडके व इतर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post