प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
मावळ दि :- मावळच्या आंबेवाडी परिसरात तरुणांचा खून झाल्याने मावळ परिसरात खळबळ उडाली आहे अनैतिक संबंधांच्या संशयातून २२ वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. वैभव उमेश सातकर (वय-२२, रा. आंबेवाडी, कान्हे) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर अंकुश जयवंत सातकर (वय-४२, रा. आंबेवाडी, कान्हे) याने हत्या केल्याचा आरोप आहे.
ही घटना मावळ तालुक्यातील कान्हे गावातील आंबेवाडी येथील शनि मंदिराजवळ घडली. हत्या झाल्याचा घटनेने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव आणि आरोपी अंकुश हे शेजारी राहत होते. वैभव याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय अंकुश याला होता. याच रागातून त्याने वैभवच्या मानेवर कोयत्याने वार केले, यामध्ये वैभवचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते आणि पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदना साठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करीत आहेत.