32.घरफोडीच्या गुन्हयांसह एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अट्टल घरफोडीतील तिघांना अटक करून 61 तोळे 08 gm.वजनाचे सोन्याचे दागिने आणि 4 कि.787 gm.वजनाचे चांदीचे दागिने आणि इतर असा एकूण 67 लाख 48 हजार 150/ रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून घरफोडीच्या 32 गुन्हयांसह एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.या अटक केलेल्यात सलीम महमद शेख (वय 37) जावेद महमद शेख (वय 30.दोघे रा.गंधारपावले ,जि.रायगड) तौफिक महमद शेख (वय 30.रा.आर.के.नगर ,को.मुळ गाव संजय गांधीनगर ,चिकोडी,जि.बेळगाव) यांचा समावेश आहे.
कोल्हापुर जिल्ह्यात होत असलेल्या घरफोडीच्या घटनेत वाढ़ झाल्याने ते गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना कोल्हापूर परिक्षेत्राचे मा.विशेष पोलिस महानिरिक्षक श्री.सुनिल फुल्लारीसो,पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना दिल्या होत्या.
वरिष्ठांनी दिलेल्या आदेशा प्रमाणे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी वेगवेगळी तपास पथके तयार करून कोल्हापूर जिल्हयात गुन्हा घडलेल्या ठिकाणी जाऊन माहिती घेत आरोपीची गुन्हाची पध्दत आणि गुन्हयांचे ठिकाण याची माहिती घेऊन तपास चालू केला.
कोल्हापूर परिसरात रात्रीच्या वेळी घडत असलेल्या घरफोडीची गुन्हे याचे पोलिसांनी गेल्या सहा महिन्यापासून सीसीटिव्ही फुटेज तपासत व त्याच प्रमाणे पेट्रोलिंग करून अनोळखी चोरट्याचा शोध घेण्याचे काम चालू होता. तपासा दरम्यान पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकातील सागर माने,संजय कुंभार,महेश खोत,लखनसिंह पाटील,महेश पाटील,विजय इंगळे यांना माहिती मिळाली की.करवीर पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा हा रायगड जिल्ह्यातील महाड येथील सलीम शेख यांने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून केल्याची माहिती मिळाली असून सध्या बेळगाव येथे रहात असल्याची माहिती मिळाली.या तपास पथकातील पोलिसांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन बेळगाव येथे जाऊन गेल्या पाच दिवसापासून वेशांतर करून सदर आरोपींचा शोध घेतला असता ते सापडले नाहीत.त्या वेळी सलीम शेख हा महाड येथे गेला असून परत तो मोटारसायकल वरुन बेळगावकडे परत येणार असल्याची माहिती मिळाली.
या पथकातील पोलिसांनी सलीम शेख आणि त्याच्या साथीदारास दि.11 एप्रिल 25 रोजी शाहुवाडी तालुक्यातील अंबाघाट येथे सापळा रचून ताब्यात घेतले.त्यांच्या चौकशी केली असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यामुळे त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना 13 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती.या कालावधीत त्यांच्याकडे मोठ्या कौशल्याने तपास केला असता त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात 32 घरफोडी केल्याची कबुली दिली.
त्यांच्या कडुन आता पर्यत सोन्या-चांदीच्या दागिन्यासह गुन्हयांत वापरलेली 3 मोटारसायकल व हत्यारे असा एकूण 67 लाख 48 हजार 150/ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींच्या कडुन कोल्हापूर,सांगली,सातारा येथील आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी अटक केलेले तिघे आरोपी हे नात्याने सावत्र भाऊ असून यातील सलीम शेख सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खेड,दापोली,रोहा,पोलादपूर आणि माणगांव आणि गोरेगाव इत्यादी ठिकाणी 32 चोरी,घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.यातील तौफीक शेख हा मोटारसायकल चोरटा आहे.
ही कारवाई मा.विशेष पोलिस महानिरिक्षक श्री.सुनिल फुल्लारीसो,पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील,अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.धीरजकुमार बच्चू,उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके,करवीर विभागाचे श्री.सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक श्री.सुनिल फुल्लारीसो यांनी कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाचे विशेष अभिनंदन केले आहे.