पोलिस दलातील १७ जणांना विशेष पोलीस महासंचालक पदक जाहीर.

 सीआयडीच्या अधीक्षक मनिषा दुबुलेसह जुना राजवाडाचे पोलिस निरीक्षक झाडे यांचा समावेश.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - पोलिस दलातील उत्कृष्ट सेवा बजावत असताना केलेल्या चोख कामगिरीबद्दल विशेष पोलीस महासंचालक पदक दिले जाते. या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील  तीन अधिकारी व चौदा कर्मचारी अशा १७ जणांना सन्मान चिन्ह जाहिर   झाले आहे. यामध्ये सीआयडीच्या  पोलिस अधीक्षका  मनिषा दुबुले आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे, एलसीबीचे उपनिरीक्षक जालींदर जाधव यांचा समावेश आहे.

   पोलिस दलात उत्कृष्ट  कामगिरी केल्या बद्दल  राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून २०२४ चे सन्मानचिन्ह जाहिर झाले. महाराष्ट्रातील पोलिस अधीक्षकांपासून ते पोलिस शिपाईपर्यंतच्या आठशे पोलिस कर्मचारी यांना सन्मानचिन्ह   सोमवारी जाहीर झाले. हा सन्मानचिन्ह प्राप्त पोलिसांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 सन्मानचिन्ह प्राप्त  जाहीर झालेल्यांमध्ये सीआयडीच्या पोलीस अधीक्षका  मनिषा भिमराव दुबुले,जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक संजीवकुमार दत्तात्रय झाडे,  पोलिस निरीक्षक रविराज अनिल फडणीस, पोलिस उपनिरीक्षक जालिंदर अंकुश जाधव, नरसु भारमाना गावडे, महादेव नारायण कुराडे, अनिल संभाजी जाधव, जनार्दन शिवाजी खाडे, पोलिस हवालदार संजय दिनकर कुंभार, राजू रामचंद्र पट्टणकुडे, अरुण रवींद्र खोत, सागर जगन्नाथ चौगुले, हिंदुराव रामचंद्र केसरे, अनुराधा देवदास पाटील, रमेश श्रीपती काबंळे, युवराज भिवाजी पाटील, पोलिस शिपाई संग्राम पांडुरंग पाटील यांचा समावेश आहे.

 सन्मानचिन्ह  जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी आणि  कर्मचाऱ्यांचा लवकरच एका कार्यक्रमात सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कामाची  दखल घेऊन  सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येते.

----------------------------------------

---------------

रागाने बघत असल्याच्या कारणातुन एकावर कोयत्याने हल्ला.

कोल्हापूर - रागाने बघत असल्याच्या कारणातुन सराईत गुन्हेगाराने पानपट्टी दुकानदारावर  कोयत्याने हल्ला  करून जखमी केल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातील  सायबर चौकात रविवारी रात्री साडेनऊ वाजता हा प्रकार घडला. यात श्रीनंद महादेव वडर (वय २४, रा. सायबर चौक) हा जखमी झाला असून पोलिसांनी सराईत गुन्हेगार अजय अनिल पाथरुट (वय २८) यास अटक केली आहे.

   अजय पाथरुट हा रविवारी रात्री पाथरुट वसाहतीमधील चौकात उभा होता. यावेळी फिर्यादी श्रीनंद वडर हा आपल्या पानपट्टी दुकानात  बसला होता. श्रीनंद आपल्या एका सहकाऱ्यासोबत बोलत होता, यावेळी अजय तेथे आला. त्याने श्रीनंद यांच्याकडे बघत  'तू माझ्याकडे रागाने का बघतोस  असा जाब विचारला. यावेळी अजयने रस्त्यात उभी केलेली दुचाकी लाथ मारून खाली पाडली, तसेच तेथे उभ्या असलेल्या रिक्षाचा आरसा हाताने फोडला.

फिर्यादी श्रीनंद व रिक्षाचालक असे दोघेजण अजय पाथरुट याच्या घरात गेले, त्यांनी अजयची आई-वडील यांना याबाबत सांगत होते, यावेळी अजय तेथे गेला. त्याने दोघांना शिवीगाळ करत कोयता हातात घेऊन श्रीनंद याच्या कानाजवळ वार केला. तो जखमी होऊन खाली पडला. यावेळी त्याला तेथील  नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले.

   श्रीनंद याने उपचार घेतल्यानंतर सोमवारी दुपारी राजारामपुरी पोलीस ठाण्यात जाऊन हल्लेखोर अजय पाथरुट याच्या विरोधात फिर्याद दिल्याने पोलिसांनी याच्यावर मारहाण, शिवीगाळ व दहशत माजवण्याचा गुन्हा दाखल केला आहे.  पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली  पुढील तपास पोलीस करीत आहेत.

---

Post a Comment

Previous Post Next Post