रुई येथील बकरी चोरी करणारी टोळी जेरबंद "



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने बकरी चोरी केल्या प्रकरणी रुई येथील फैजल रफीक कुमनाळे (20) व पारस बाबासो पुजारी (20.दोघे रा.रुई,ता.हातकंणगले जि.को.) यांना अटक करून त्यांच्या कडुन एक लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना दिल्या होत्या.

वरिष्ठांच्या सुचने प्रमाणे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी आपल्या पथकातील वेगवेगळी तपास पथके तयार करून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा तपास करीत असताना रुई येथील फैजल कुमनाळे आणि त्याच्या साथीदारांनी बकरी चोरलेली असून ती बकरी विक्री करुन आलेल्या पैशाची वाटणी करण्यासाठी आळते फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार अशोक पवार यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने आळते फाटा येथे जाऊन फैजल कुमनाळे व पारस पुजारी या दोघांसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांनी चोरीतील बकरी विकून आलेले 30 हजार रोख रक्कम मिळाली.सदर बकरी चोरीचा  हातकंणगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यांनी गुन्हयांची कबूली दिली.सदर आरोपी कडुन 30 हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्हयांत वापरलेले वाहन 70 हजार रुपये किमंतीची असा एकूण 1 लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपीना पुढ़ील तपासासाठी हातकंणगले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलिस अशोक पवार ,अरविंद पाटील,संजय पडवळ,विजय इंगळे,रोहित मर्दाने,संदिप बेंद्रे,नवनाथ कदम आणि हंबीर अतिग्रे यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post