प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - जातीचा दाखला काढ़ण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला मागणी साठी गेलेल्या तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच घेताना रविवार पेठ येथील शेलाजी वनाजी शाळेचा प्रभारी मुख्याध्याक संजय जयसिंग नार्वेकर (वय 52.रा.सांगाव रोड ,दत्त कॉलनी,कागल) याला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडून कारवाई केली.
यातील तक्रारदार यांना जातीचा दाखला काढ़ण्यासाठी त्यांच्या वडीलांचा आणि पाच चुलत्यांचा असे एकूण सहा शाळा सोडल्याचा दाखला मागणी साठी शेलाजी वनाजी या मराठी शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक यांची भेट घेतली.त्या वेळी शाळेचा मुख्याध्यापक संजय नार्वेकर यांनी तक्रारदाराकडे एका दाखल्या साठी 500/ रुपये प्रमाणे सहा दाखल्यांचे एकूण तीन हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याने तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.लाचलुचपत विभागाने दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता मुख्याध्यापक संजय नार्वेकर यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचून शेलाजी वनाजी या मराठी शाळेचा मुख्याध्याक संजय नार्वेकर याला तक्रादाराकडून तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडून कारवाई केली.त्याच्यावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते.
ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बापू सांळूखे,पोहेकॉ.विकास माने,सुनिल घोसाळकर,पोलिस नाईक सचिन पाटील ,पोलिस कॉ.संदिप पवार यांनी केली.