ऊसाच्या क्रेन वरुन पडल्याने परप्रांतियाचा मृत्यु.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - भोगावती साखर कारखाना येथे ऊस ऊचलत असलेल्या क्रेन वरुन क्रेनची मापे घेत असताना लोटनकुमार ज्ञानेश्वर सहनी (वय 25.रा.मझौलिया,बिहार ) याचा तोल जाऊन खाली पडल्याने जखमीला बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.हा प्रकार गुरुवार (दि.24 एप्रिल ) रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडला.  ठिकपूर्ली येथील ठेकेदाराकडे काही परप्रांतिय मजूर कामाला आहेत.त्यातील लोटनकुमार हा आज सकाळी क्रेनची मापे घेत असताना हा प्रकार घडला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

________________________________________________

मोटारसायकल स्लिप होऊन मुलगा ठार .

कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील पोंबरे येथील साहिल कोंडिबा कांबळे (वय 13) हा काऊरवाडी येथे मोटारसायकल वरुन जात असताना त्या परिसरात असलेल्या ओढ़याजवळ मोटारसायकल स्लिप होऊन खाली पडल्याने जखमीला बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला. हा प्रकार गुरुवार (दि.24 एप्रिल ) रोजी दुपारी एकच्या सुमारास घडला. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

साहिल हा नववीच्या वर्गात शिकत असून त्याचे वडील शेती करतात.साहिल हा एकूलता एक मुलगा होता.आज दुपारी एकच्या सुमारास मोटारसायकल वरुन काळजवडे गावी जात असताना हा प्रकार घडला.त्याच्या पश्च्यात आई-वडील आणि दोन बहिणी आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post