प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -जोतिबा डोंगर ते यमाई मंदीर परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा त्याचे तोंड ,हात बांधल्याच्या स्थितीत मृतदेह आढ़ळला.हा प्रकार शनिवार (दि.19) रोजी तेथील नागरिकांच्या लक्ष्यात आल्याने ही माहिती पोलिसांना देण्यात आली.त्याच्या गळ्यावर व्रण असून त्याचा गळा आवळून खून केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.या खूनाची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली आहे.
सदर इसमाचे प्रेत ज्योतिबा यमाई मार्गे गिरोली 12 ज्योतिर्लिंग मुरगुळ्यावर आढळून आलेले आहे. सदर इसम कोणाच्या परिचयाचा असेल, ज्योतिबा वरील गुरव बंधूंचा भाविक भक्त असेल, हॉटेल कर्मचारी असेल, सासनकाठीधारक असेल अथवा इतर काहीही माहिती असेल तरी कृपया तात्काळ कोडोली पोलीस स्टेशन, कोडोली येथे संपर्क साधावा.
सहाय्यक पोलीस निरीक्षक,
कोडोली पोलीस ठाणे, कोडोली
9922444949