"जोतिबाच्या नावाने चागभलं "च्या गजरात चैत्र यात्रा मोठ्या उत्साहात.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - चैत्र यात्रे निमित्त जोतिबा डोंगर भाविकांच्या उपस्थित "जोतिबाच्या नावाने चागभलं "गजरात मोठ्या उत्साहात पार पडली.गुलाल खोबरे उधळत सासनकाठीच्या मिरवणूकीने लाखो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फ़ेडले.मुख्य यात्रेच्या दिवशी पहाटेच्या सुमारास पाद्यपूजा,काकड आरती सोहळा संपन्न झाला.शासकीय अधिकारी आणि जोतिबा पुजारी यांच्या हस्ते "श्री जोतिबास महाभिषेक घालण्यात आला.या वेळी जोतिबाचे पुजारी आनंदा बुणे,महादेव झुगर,बाळकृष्ण सांगळे यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी बांधली.दुपारच्या सुमारास मानाच्या निनाम पाडळी येथील सासनकाठीचे पूजन पालकमंत्री प्रकाश आबिटकर ,मंत्री शंभूराजे देसाई ,आ.सतेज पाटील,जिल्हाधिरी,अमोल येडगे,पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्यासह इतर मान्यंवरांच्या हस्ते पूजन करून सासनकाठीच्या मिरवणूकीस सुरुवात झाली.

सायंकाळच्या सुमारास चैत्र यात्रेचा मुख्य पालखी सोहळा तोफ़ेची सलामी देऊन हा पालखी सोहळा श्री यमाई मंदिराकडे लवाजम्यासह मार्गस्थ झाला.या वेळी भाविकांनी पालखीवर गुलाल खोबरे उधळत "जोतिबाच्या नावाने चागभलं"केदारनाथाच्या नावाने चागभलं"नारा दिला.पालखी सोहळा यमाई मंदीराकडुन परत जोतिबा मंदीराकडे परतली.शेवटी डवरी आणि ढ़ोली  यांनी गायन केले.

या वेळी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.

Post a Comment

Previous Post Next Post