प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील चाफोडी येथे रविवार (दि.20 एप्रिल 25) रोजी सकाळी सातच्या सुमारास चाफोडी येथील क.आरळे ते चाफोडीकडे जात असलेल्या रोडवर घोडागाडी शर्यतीचे आयोजन करुन घोड्याला गाडीला जुंपवून त्यांना निर्दयपणे पळवून त्यांचा छळ केल्या प्रकरणी चाफोडी गावचे पोलिस पाटील भगवान अर्जुना पाटील यांनी करवीर पोलिस ठाण्यात आयोजकांच्या विरोधात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात घोडागाडी शर्यतीवर मा.जिल्हादंडाधिरी यांचा बंदी आदेश असताना तसेच चाफोडी येथील ग्रामपंचायत व करवीरचे मा.प्रांताधिकारी यांची परवानगी न घेता घोडागाडीचे आयोजन केल्या प्रकरणी करवीर पोलिसांनी संदेश कुंडलीक सुर्वे,अनिकेत धनाजी काशिद,अनिकेत भिकाजी पाटील,श्रीकांत नामदेव सुतार,हरी भिकाजी गुरव,ओंकार महादेव दळवी,वैभव शिवाजी घोलम,संकेत सर्जेराव पाटील,संजय रामराव सुतार (सर्व रा.चाफोडी ता.करवीर ) आणि दिपक श्रीकांत गुरव (रा.गर्जन) या दहा जणांवर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याचा पुढ़ील तपास पोसई गळवे करीत आहेत.