प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथे रहात असलेल्या अल्पवयीन मुलीने बुधवार (दि.16 एप्रिल) रोजी सायंकाळी साडे आठच्या सुमारास रहात असलेल्या घरातील पंख्याला ओढ़णीने गळ्यास गळफास लावून घेतल्याने तिच्या नातेवाईकांनी गळ्यातील गळफास सोडवून बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल असता तिचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती.वडील शेताकडे गेले होते.तर आई बाजारात गेल्या होत्या.सदर अल्पवयीन मुलीने घरी कुणी नसल्याचे पाहून हा प्रकार केल्याचे समजते.तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.