जोतिबाच्या यात्रेला वजीर रेस्क्यू फोर्सने केलेल्या कामाचे महत्त्व स्पष्टपणे जाणवले



प्रेस मीडिया लाईव्ह :

 कोल्हापूर : गुलाल खोबऱ्याची उधळण आणि चांगभलं चा गजर हे यात्रेतील भक्तिमय आणि उत्साही वातावरणाचे प्रतीक आहे. दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेला सुरुवात झाली, हे भाविकांसाठी आनंदाचे आणि श्रद्धेचे क्षण आहेत.जोतिबाच्या यात्रेतील उत्साहाचे आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी व वजीर रेस्क्यू फोर्सने केलेल्या कामाचे महत्त्व स्पष्टपणे जाणवते.

अशा मोठ्या यात्रेमध्ये भाविकांची सुरक्षा आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथक आणि वजीर रेस्क्यू फोर्स यांनी केलेले कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संपाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली पथकाने दोन दिवस कर्यारीत राहून कोणतीही अनुचित घटना घडू दिली नाही, हे प्रशंसनीय आहे.

यात्रेमध्ये अनेक अडथळे येऊ शकतात, जसे की गर्दी, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कोणतीही दुर्घटना. या सर्व अडथळ्यांवर मात करून पथकाने येणाऱ्या सर्व भक्तांच्या सुरक्षेसाठी स्वतःला समर्पित केले, हे त्यांचे मोठे योगदान आहे.

जोतिबाच्या यात्रेतील येणारे भाविकांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथका व वजीर रेस्क्यू फोर्सचे समर्पण दिसून येते. त्यांचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.

Post a Comment

Previous Post Next Post