प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - शिये येथील रामनगर परिसरात असलेल्या ION डिझिटल झोन जवळ चालत जात असलेल्या एका अनोळखी वृध्दाला उडविल्याने वृध्द जागीच ठार झाला.तर हनुमाननगर येथे रहात असलेला तरुण जखमी झाला.हा प्रकार शनिवार (26 एप्रिल) रोजी दुपारी साडे चार ते पाचच्या सुमारास घडला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की,शिये येथील हनुमाननगर परिसरात रहात असलेला सुनिल प्रभाकर भोरे (वय 41) हे गंवडी कामासह एमआयडीसी येथे पडेल ते काम करतात.काही कामा निमित्त दुपारच्या सुमारास रामनगर येथे गेले होते.परत आपल्या घरी हनुमाननगर येथे जात चालत असताना त्या मार्गावरुन जात असलेल्या एर्टिका कारने सुनिल भोरे याला धडक पुढ़े जाऊन 70 वयाच्या एका अनोळखी वृध्दाला जोराची धडक देऊन पुढ़े तेथे एका विजेच्या पोलला जाऊन थांबली.या अपघाताची माहिती शिरोली एमआयडीसी पोलिसांना समजताच पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा करून जखमीना पोलिसांनी 108 रुग्णवाहिकेतुन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे गंभीर जखमी झालेल्या वृध्दाचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.
शिरोली एमआयडीसी पोलिसांच्या कडुन मयत झालेल्या वृध्दाची ओळख पटविण्याचे काम चालू होते. तर जखमी सुनिल भोरे यांच्या हाताला दुखापत झाल्याने त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार चालू आहेत.