लग्नाला म्हणून जायचे आणि मंगल कार्यालयात जाऊन सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारणाऱ्या चोरट्यास अटक करून 3 लाख 75 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने लग्नाला म्हणून जायचे आणि तेथील मंगल कार्यालयात सोन्याच्या दागिन्याची चोरी करणारा आरोपी  बाळासो उर्फ अजित प्रकाश पाटील (वय 28.रा.आदमापूर ,ता.भुदरगड ) याला अटक करून त्याच्या कडुन 3 लाख 78 हजार 470 रुपये किमंतीचे 42gm.वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

सध्या लग्नाचा हंगाम सुरू असल्याने कोल्हापुर जिल्हयात होत असलेल्या चोरीच्या गुन्हयांसह मंगल कार्यालयातही चोरीचे गुन्हे होत असल्याने पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यकडे तपास करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना दिल्या होत्या.

वरिष्ठांनी दिलेल्या सुचने नूसार पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तपास पथके तयार करून कोल्हापुर जिल्ह्यात गुन्हे घडलेल्या ठिकाणी जाऊन त्यांची गुन्हा करण्याची पद्धत ,ठिकाणे इतर तांत्रिकदृष्ट्या तपास करून  चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपास चालू केला.पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हयांच्या ठिकाणी भेट देऊन गुन्हयांची माहिती घेत असताना पोलिस अंमलदार सुरेश पाटील,रुपेश माने,अमित सर्जे आणि राम कोळी यांना माहिती मिळाली की,लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दाखल असलेला चोरीचा गुन्हा हा पोलिस रेकॉर्ड वरील आरोपी  बाळासो उर्फ अजित प्रकाश पाटील यांने केला असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिस .निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने आदमापूर येथे जाऊन बाळासो उर्फ अजित पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांने प्रथम उडवा उडवीची उत्तरे  दिली.त्याला अधिक विश्वासात  घेऊन चौकशी केली असता त्याने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयांसह कंळबा येथील जय पॅलेस व करवीर तालुक्यातील हणबरवाडी येथे असलेल्या सुष्टी फार्म हाऊस या मंगल कार्यालयात चोरी केल्याची कबुली दिली.त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडे सखोल तपास करून त्याच्याकडील 3 लाख 78 हजार 470 रुपये किमंतीचे  42gm.वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहे.

याच्यावर लक्ष्मीपुरी ,करवीर आणि इस्पुर्ली पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल होते ते उघडकीस आणले. या आरोपीवर घरफोडी ,जबरी चोरीचे 21गुन्हे कोल्हापूर ,पुणे येथे दाखल असून आरोपी अजित पाटील याला पुढ़ील तपासासाठी लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत ,अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.धीरजकुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे,पोलिस सुरेश पाटील,रुपेश माने,अमित सर्जे,राम कोळी,अनिकेत मोरे,हंबीरराव अतिग्रे,समीर कांबळे,राजू कांबळे,प्रविण पाटील आणि विनोद कांबळे यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post