प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - वाशीनाका येथे संशयास्पद खून झालेल्या प्रकाश जयवंत दळवी (वय 45.रा.सासनेनगर ,आयटीआय हॉस्टेलच्या मागे,को.) याचा खून केल्या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सचिन भिमराव घाटगे(वय 32) बट्टू उर्फ रोहित रामचंद्र कांबळे (28) योगेश गुंडा खोंद्रे (31)ओंकार अनिल पाटील (चौघे रा.शिरोली दु.ता.करवीर जि.को.) आणि अजिंक्य शिवाजी शहापूरे (रा.अष्टविनायक कॉलनी,आर.के.नगर ,को) या पाच जणांचा सहभाग असून यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
प्रकाश दळवी यांचा शिरोली दु.येथे आरोपी सचिन घाटगे यांच्या पठार नावाच्या शेतात असलेल्या खोपीत दि.02 एप्रिल ते 03 एप्रिल या दरम्यान खूनाचा गुन्हा घडला होता.
वाशीनाका येथे 03 मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास प्रकाश दळवी हे मयत स्थितीत आढ़ळून आल्याने करवीर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यु म्हणून नोंद झाली होती.सदर मयताचा तपास करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक नाथा गळवे करीत होते.सदर मयत प्रकाश दळवी यांच्या हातापायावर ,तोंडावर आणि कानावर मारहाणीचे व्रण दिसून आले.त्याच प्रमाणे डोळा व कान सुजलेला आढ़ळल्याने त्याला कुणीतरी मारहाण करून त्यातच त्याचा मृत्यु झालाचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले. त्यानूसार गुन्हे शोध पथकाला सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.या पथकातील पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहिती घेत असताना प्रकाश दळवी यांचा 02 मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास जरगनगर येथील शिशू बार जवळ अनोळखी दोघांच्या बरोबर भांडण होऊन त्यांच्यात झटापट झाल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तेथील सीसीटिव्ही फुटेज पाहिले असता प्रकाश दळवी याला दोघे जण जबरदस्तीने मोपेड गाडीवरून घेऊन जाताना दिसल्याने त्यांची माहिती घेतली असता आरोपी सचिन घाटगे व अजिंक्य शहापूरे असल्याची माहिती मिळाली.त्यांचा शोध घेत त्यांना ताब्याट घेऊन चौकशी केली असता मयत प्रकाश दळवी यांने लोन मंजूर करून देतो म्हणून 65 हजार रुपये घेतले.मात्र लोन मंजूर करून दिले नाही.याबाबत त्याच्याकडे वारंवार लोन बाबत चौकशी केली असता लोन मंजूर होणार आहे,प्रोसेस चालू आहे असे वारंवार सांगत होता.म्हणून प्रकाश दळवी कोणत्या बार मध्ये बसतो याची माहिती घेऊन त्या ठिकाणी जाऊन त्याच्याकडे लोन बाबत विचारणा केली असता कोणते पैसे ,तुला काय करायचंय ते कर ,असे म्हणताच रागाच्या भरात त्याला तेथे मारहाण करून पुईखडी येथील मोकळ्या जागेत आणून त्याला बेदम मारहाण केली.हा काय तर करेल म्हणून सचिन याने आणखी तिघांना बोलावून घेऊन या आरोपीनी प्रकाश दळवी याला सचिन घाटगे यांच्या शिरोली दु.येथील त्याच्या शेतातील खोपीत रात्रभर डांबून ठेवून आरोपी सचिन यांच्या सांगण्यावरून प्रकाश दळवी याला वाशीनाका येथे सोडल्याचे सांगितले.प्रकाश दळवी याला चप्पलने बेदम मारहाण करून सोडून देऊन त्याला वेळेत उपचार न मिळाल्याने त्यातच त्याचा मृत्यु झाला.
सदर मयताच्या खूनाचा सबळ पुरावा नसताना गुन्हे शोध पथकाने आपल्या कौशल्याने आणि विचारपूर्वक तपास करून यातील तिघांना अटक करण्यात यश आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.धीरजकुमार बच्चू,उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर शिंदे,पोसई नाथा गळवे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.