राज्य उत्पादन शुल्कच्या पोलिसा कडुन भाजप पदाधिकाऱ्याला धक्काबुक्की ! धर्मादाय कार्यालयाच्या लिफ्टमधील प्रकार.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : बागल चौक येथे  GST कार्यालय, क्र. ३ व धर्मादाय आयुक्त कार्यालय आहे.  येथील इमारतीच्या लिफ्टमधून खाली येत असताना साहेब येत आहेत "ऐ "बाहेर हो असे म्हणून घाईत असणाऱ्या राज्य उत्पादन शुल्कच्या पोलीस हवालदारने  भाजप पदाधिकाऱ्याला धक्काबुक्की करून लिफ्टमधून खाली बाहेर ढकलून दिल्याने दोघांत  शाब्दिक वाद निर्माण झाला. 

   या वेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना जोतिबा मंदिरावर सुरू असलेल्या भोंगळ कारभारावर कारवाई करण्यासाठीचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या भाजपा शिवाजी पेठ मंडल अध्यक्ष प्रकाश सरनाईक हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत इमारतीच्या सामान्य लिफ्टमधून खाली येण्यासाठी लिफ्ट मध्ये आत प्रवेश करत असताना  लिफ्ट मध्ये उपस्थित असणारा केंद्रीय उत्पादन शुल्क पोलिस हवालदार बाळासाहेब पाटील याने सरनाईक यांना "ऐ "बाहेर हो साहेब येत आहेत म्हणत लिफ्टमधून बाहेर ढकलून दिले. त्यामुळे लिफ्ट खाली आल्यावर दोघांत शाब्दिक वाद निर्माण झाला. या घडलेल्या प्रकारामुळे  आवारातील शासकीय अधिकारी  आणि  कर्मचारी गोळा  झाल्याने वातावरण कमालीचे तापले. सध्या देशात व राज्यात भाजपची  सत्ता असताना पोलीस पदाधिकाऱ्यांवर असा वर्दीचा गैरवापर करत असतील तर सामान्य जनतेचे काय ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post