तरुणावर वृध्दाचा कुऱ्हाडीने हल्ला.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - स्टेशनरी दुकानात खरेदी केलेल्या वस्तुचे बिल ऑनलाईन केलेले  मोबाईलवर जमा न झाल्याने त्याच्यात वाद होऊन आशिष तानाजी कुडित्रेकर (वय 32.रा.रामानंदनगर ,कोल्हापूर ) या तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी केल्या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी राजेंद्र चव्हाण (वय 65.रा.मुक्तसैनिक वसाहत,कोल्हापूर ) याला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

राजेंद्र चव्हाण यांचे कोल्हापूर महानगरपालिके समोर स्टेशनरीचे दुकान आहे.त्या दुकानात शुक्रवार (दि.04 एप्रिल ) रोजी रात्री दहाच्या सुमारास आशिष तानाजी कुडित्रेकर हे मुलगी अद्विका हिला गल्ला (भिशी) घेण्यासाठी गेले होते.त्याचे बिल चव्हाण गिफ्ट आर्टिकल या नावावर ऑनलाईन पे केले.त्याची रिसीट कुडित्रेकर यांनी चव्हाण यांना दाखविली.मात्र चव्हाण यांच्या अंकौंटवर जमा झाले नसल्याचे म्हणू लागले .तेव्हा कुडित्रेकर यांनी त्यांच्या मोबाईलवरील ऑनलाईन पेंमेट ट्रान्झक्शन तपासण्यास सांगितले.तेव्हा चव्हाण यांच्या मोबाईलवर ऑनलाईन पैसे जमा न झाल्यामुळे त्यांच्यात वाद होऊन राजेंद्र चव्हाण यांनी आशिष कुडित्रेकर यांना शिवीगाळ करत दुकानातील कुऱ्हाडीने आशिष याच्या हाताच्या पंजावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याने त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन याची फिर्याद शनिवार (दि.05) रोजी  लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी राजेंद्र चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याचा पुढ़ील तपास सहा.फौ.गावडे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post